पुण्यात लॉकडाऊनसंदर्भात आजपासून नवीन आदेश ; काय होणार सुरु अन् काय राहणार बंद ? जाणून घ्या.. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:44 AM2020-06-08T11:44:42+5:302020-06-08T11:57:23+5:30

पुणेकरांना ह्या नियमांतून मिळणार सवलत तर या गोष्टींसाठी करावी लागणार प्रतीक्षा

New order regarding lockdown in Pune from today; What will start and what will stop? Find out .. | पुण्यात लॉकडाऊनसंदर्भात आजपासून नवीन आदेश ; काय होणार सुरु अन् काय राहणार बंद ? जाणून घ्या.. 

पुण्यात लॉकडाऊनसंदर्भात आजपासून नवीन आदेश ; काय होणार सुरु अन् काय राहणार बंद ? जाणून घ्या.. 

googlenewsNext
ठळक मुद्दे१० टक्के मनुष्यबळात खाजगी कार्यालये आजपासून सुरु घरपोच वर्तमानपत्र वितरणासही मान्यता 

पुणे : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोरोना संदर्भात सर्वतोपरी काळजी घेत सर्वसामान्य चाकरमान्यांचे, तसेच छोट्या मोठ्या उद्योजकांचे जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकार विविध मार्गांनी पावले टाकत आहे. त्याच धर्तीवर पुण्यात देखील प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर झाली आहे. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या आदेशानुसार कोरोना विषयक उपाययोजना संदर्भात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना ८ जूनपासून (आजपासून)  खाजगी कार्यालये त्यांच्या कर्मचारी संख्येच्या जास्तीत जास्त १० टक्केपर्यंत उपस्थितीत सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे़ याचबरोबर आजपासून वर्तमानपत्रांचे घरपोच वितरण करण्यास (वर्तमानपत्र घेणाऱ्या व्यक्तीच्या सहमतीने) परवानगीही देण्यात आली आहे. 
२ जून रोजी महापालिका आयुक्त यांनी काढलेल्या आदेशात तीन टप्प्यात शहरात अटींसह शिथिलीकरणास मान्यता दिली होती. यामध्ये ८ जून पासून पुढील बाबी सुरू होत आहेत. 

यामध्ये खालील बाबींचा समावेश आहे़

१.खाजगी कार्यालये  (१० टक्के मनुष्यबळासह)
२. लग्न समारंभ (५० व्यक्तींसह)
३. अंत्यसंस्कार अनुषंगिक कार्यक्रम (२० व्यक्ती)
४. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे व्यवसाय 
५. माहिती व तंत्रज्ञान विषयक हार्डवेअरची निर्मिती व पॅकेजिंगकरिता लागणाºया वस्तूंची निर्मिती
६. दालमिळ, अन्न प्रक्रिया उद्योग
७. घरकाम करणाºया व्यक्ती (घर मालकाची इच्छा असल्यास)
८. ज्येष्ठ नागरिकांचे मदतनीस 
९. वर्तमानपत्रे वितरण व स्टॉल (स्टॉल वितरण मुभा )
१०. वित्तीय क्षेत्र (कमीत कमी व आवश्यक कर्मचारी वर्गासह)
११. ई-कॉमर्स (घरपोच वस्तूंचे वितरण)
१२. माहिती तंत्रज्ञान (माहिती तंत्रज्ञान विषयक काम करणारे व सेवा देणारे व्यवसाय)
१३.खाद्य पदार्थ सेवा (खाद्यपदार्थ पार्सल सेवा)
१४. बांधकाम विषयक (प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बाहेरील मजूर न आणता कामाच्या ठिकाणी मजूरांच्या राहण्याची व्यवस्था होत असेल तर अशा बांधकाम प्रकल्पांना मान्यता)
१५. मेट्रो काम
१६. धोकादायक इमारती पाडण्याची कारवाई
-------------------
    वरील मान्यतांसह शहरातील विविध रस्त्यांवरील अधिकृत पथारी व्यावसायिक यांना दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय करता येईल. परंतु, दोन पथारी व्यावसायिकांमध्ये ५ मीटरचे अंतर ठेवणे आवश्यक असून, हातमोजे व मास्क घालून त्यांना व्यवसाय करावा लागेल. 
पथारी व्यवसायास परवानगी दिलेले शहरातील रस्ते
१. शिवाजी रस्ता : पुणे मनपा - डेंगळे पुल - शनिवारवाडा ते जेथे चौक
२. बाजीराव रस्ता : पुरम चौक - माडीवाले कॉलनी - शनिवार चौक - विश्रामबागवाडा - शनिवारवाडा़
३. हडपसर : सोलापूर रोड - मगरपट्टा चौक ते गाडीतळ, गाडीतळ ते लक्ष्मी कॉलनी चौक ते शेवाळवाडी टोलनाका ते पुणे शहर हद्दपर्यंत़ तसेच गाडीतळ ते फुरसुंगी सासवड रोडने पुणे शहर हद्दीपर्यंत़
४.  सातारा रोड : जेधे चौक - लक्ष्मीनारायण थिएटर, सिटी प्राईड, विवेकानंद पुतळा, धनकवडी फ्लाय ओव्हर ते कात्रज चौक, कात्रज चौक ते सातारा रोडने पुणे शहर हद्दीपर्यंत़
५. नगर रोड : येरवडा पर्णकुटी, गुंजन चौक, विमाननगर, वडगावशेरी, खराडी बायपास चौक ते वाघोली, तैलाची मोरी ते पुणे शहर हद्दीपर्यंत़
६. एअरपोर्ट रोड : गुंजन चौक- गोल्फ क्लब रोड, येरवडा पोस्ट आॅफिस-नागपूर चाळ-जेल रोड पोलीस चौकी, संजय पार्क - ५०९ चौक - एअरपोर्ट़
७.  सिंहगड रोड : दांडेकर पुल - पानमळा - रोहन कृतिका लगत, नाकोडा नगर - राजाराम पुल - विठ्ठलवाडी , संतोष हॉल - आनंदनगर, माणिकबाग - वडगाव धायरी उड्डाणपुल, धायरी फाटा -धायरी शेवटचा बसस्टॉप़
८. पौड रोड : खंडोजीबाबा चौक - स्वांतत्र्य चौक - नळ स्टॉप - कर्वेरस्ता फ्लायओव्हर- आनंदनगर - शास्त्री नगर, कोथरूड बस डेपो -चांदणी चौक
९.  जंगली महाराज रोड : संचेती चौक - झाशी राणी चौक - डेक्कन जिमखाना - संभाजी पुतळा - खंडोजी बाबा चौक
१०. एफसी़रोड : खंडोजीबाबा चौक - गुडलक चौक - वैशाली हॉटेल - फर्ग्युसन कॉलेज - संत ज्ञानेश्वर पादुका चौक - शिवाजीनगर पोलीस स्टेशन
११. गणेशखिंड रोड : शिमला चौक - म्हसोबा चौक - सेट्रल मॉल - शासकीय तंत्रनिकेतन - विद्यापीठ चौक - राजभवन - इंदिरा गांधी झोपडपट्टी - राजीव गांधी पूल औंध - पुणे शहर हद्दीपर्यंत. 
--------------------
पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित बाबी ( परवानगी नसलेले ) 
१. शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण वर्ग, विद्यार्थ्यांच्या शिकवण्या इ़
२. सिनेमा हॉल, व्यायाम शाळा, पोहण्याचे तलाव, करमणुकीची ठिकाणे, नाट्यगृहे व या अनुषंगिक ठिकाणे़
३. सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम आणि कोणतेही कारणाने होणारी मोठी गर्दी़
४. सर्वसामान्य व्यक्तींसाठी असलेली धार्मिक स्थळे़
५. केशकर्तनालय / ब्युटी पार्लर, स्पा़
६. मॉल, हॉटेल, उपहारगृहे आणि अन्य आदरातिथ्य करणाºया सेवा़ 

Web Title: New order regarding lockdown in Pune from today; What will start and what will stop? Find out ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.