दौंडला नव्याने पोलिस चौकी तर पाटसला पोलिस स्टेशन मंजूर : राहुल कुल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 03:05 PM2023-07-28T15:05:13+5:302023-07-28T15:06:04+5:30

पाटसला नवे पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येईल...

New police post for Daund, police station for Patsa approved: Rahul Kul | दौंडला नव्याने पोलिस चौकी तर पाटसला पोलिस स्टेशन मंजूर : राहुल कुल

दौंडला नव्याने पोलिस चौकी तर पाटसला पोलिस स्टेशन मंजूर : राहुल कुल

googlenewsNext

दौंड (पुणे) : यवत (ता. दौड) येथील पोलिस स्टेशनचे विभाजन करून पाटसला नवे पोलिस स्टेशनची निर्मिती करण्यात येईल. तसेच दौंड शहरात आणखी एक पोलिस चौकी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

दौंड तालुक्यात दौंड व यवत पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, एसआरपी गट क्रमांक पाच आणि सात, नानवीज पोलिस प्रशिक्षण केंद्र या आस्थापना आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. तसेच, दौंड शहरात एक पोलिस चौकी तर पाटसला पोलिस स्टेशन व्हावे, अशी मागणी राहुल कुल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

याशिवाय दौंड तालुका ७० टक्के पीएमआरडीएमध्ये गेलेला आहे. तालुक्यात रेल्वे जंक्शन व रेल्वेलाइन, तीन महामार्ग आणि एक एमआयडीसी असूनही तालुक्यात केवळ दोनच पोलिस स्टेशन आहेत. त्यामुळे पाटसला नवीन पोलिस ठाणे सुरू करावे. त्याचा प्रस्तावही तयार केला हेाता. त्याची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी कुल यांनी विधानसभेत केली.

त्यावर उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, राहुल कुल यांनी पाटस पोलिस ठाण्याच्या संदर्भात केलेली मागणी मी मंजूर करत आहे, अशी घोषणा केली. पोलिसांचा आकृतिबंध नसल्यामुळे ही मागणी एवढे दिवस मान्य होत नव्हती; पण आपण आता पोलिसांच्या नवीन आकृतिबंधाला मान्यता दिलेली आहे, त्यामुळे नव्या पोलिस ठाण्यासंदर्भातील प्रश्न मिटला आहे.

दौंड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एक पोलिस चौकी निर्माण करण्यासाठीही आपल्याला जागा उपलब्ध झालेली आहे; त्यामुळे दौंड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत एक पोलिस चौकीही मंजूर करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पोलिस इमारती सर्वांना एकाच वेळी देता येणार नाहीत. त्यांची प्राधान्य यादी ठरविण्यात आली आहे. आमदार राहुल कुल आणि तेथील विभागप्रमुखांशी चर्चा करून यादीतील कुठल्या इमारतीला प्राधान्य द्यायचे, याचा निर्णय घेण्यात येईल. टप्प्याटप्प्याने इतर सर्वच इमारतींचे काम करणार आहोत, असेही गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Web Title: New police post for Daund, police station for Patsa approved: Rahul Kul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.