जिल्हा पोलिसांसाठी रजेचे नवे धोरण

By admin | Published: May 18, 2017 06:04 AM2017-05-18T06:04:08+5:302017-05-18T06:04:08+5:30

ग्रामीण पोलिसांसाठी एक खूषखबर! ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पोलिसांसाठी रजेचे नवीन धोरण निश्चित केले असून, त्यानुसार सर्व पोलीस

New policy for leave for district police | जिल्हा पोलिसांसाठी रजेचे नवे धोरण

जिल्हा पोलिसांसाठी रजेचे नवे धोरण

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ग्रामीण पोलिसांसाठी एक खूषखबर! ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी पोलिसांसाठी रजेचे नवीन धोरण निश्चित केले
असून, त्यानुसार सर्व पोलीस
शिपाई ते सहायक फौजदार यांना दरवर्षी कमीतकमी वीस दिवस अर्जित रजेवर सोडण्यात येणार आहे. तसेच अपवादात्मक परिस्थितीत अधिक रजेची आवश्यकता असल्यास स्वतंत्ररीत्या विचार करून रजा मंजूर करण्यात येणार आहे.
पोलीस दलातील अधिकारी
व कर्मचारी यांना कामाच्या
व्यापामुळे व रजेच्या सुयोग्य नियोजनाअभावी रजा उपभोगता
येत नाही. याचा त्यांच्या आरोग्य जीवनावर व त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आहे. खाजगी आयुष्यातील कामांसाठी त्यांना रजेची गरज असते.

Web Title: New policy for leave for district police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.