कोविडच्या आपत्तीत कार्यकर्त्यांमध्ये सेवेचे एक नवे बीजारोपण : फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:28+5:302020-12-26T04:10:28+5:30
पुणे : संकट काळात सर्वात प्रथम धावून जाणारे संघ कार्यकर्ते असतात. पण याचे सादरीकरण आपण कधी करत नाही. कोविड ...
पुणे : संकट काळात सर्वात प्रथम धावून जाणारे संघ कार्यकर्ते असतात. पण याचे सादरीकरण आपण कधी करत नाही. कोविड आपत्तीत सेवेचे एक नवे बीजारोपण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये झाले आहे. अशावेळी या कामाचे एक डॉक्युमेंटेशन तयार झाले पाहिजे. याचे कारण भविष्यात अशी आपत्ती आल्यावर त्याचा उपयोग पुढील पिढीला होतो, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्या कोरोना आपत्तीत केलेल्या कामांच्या '''''''' जिथे गरज तिथे धीरज'''''''' या छायाचित्रांच्या पुस्तकाचे प्रकाशन व स. प. महाविद्यालयातील नूतनीकरण केलेल्या ‘लेडी रमाबाई हॉल’चे उदघाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, खासदार गिरीश बापट, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एस. के. जैन, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मुक्ता टिळक, प्रकाशक आशिष चांदोरकर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, संघाच्या संस्कारात सेवा ही ठायी असून, ती शिकवली गेली आहे. काही जण केवळ फोटो काढून अनेक पुरस्कार ही मिळवतात. पण केवळ संकट काळात नव्हे तर इतर वेळी आपण समाजासाठी काम करू शकतो यासाठी घाटे नेहमी प्रयत्नशील असतात.
चंद्रकांत पाटील यांनी घाटे आपत्तीच्या काळात मदत करण्यास नेहमी पुढे असतात. केवळ पुण्यातच नव्हे तर जेथे जेथे अडचण असेल तेथे ते स्वतः जातात.’’ ‘‘ हे पुस्तक केवळ ‘धीरज घाटेपुरते र्यादित नाही, तर भाजपला अभिप्रेत असलेले काम करणाऱ्या भाजप व संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आहे, अशा भावना धीरज घाटे यांनी व्यक्त केली.
-----