नवीन वाहन क्रमांक मालिका सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:06+5:302021-08-15T04:13:06+5:30
उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयाचे आवाहन बारामती : बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रोजी खासगी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत ...
उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयाचे आवाहन
बारामती : बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात रोजी खासगी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. ही मालिका दुचाकी वाहनासाठी सुरू करण्यात येत असून चारचाकी वाहनांनादेखील आकर्षक क्रमांक घेता येईल. मालिकेतील नोंदणी क्रमांक प्रथम प्राधान्याने विहित शुल्क भरून चारचाकी वाहनांना देणेत येईल व त्यानंतर दुचाकी वाहनांना देणेत येईल.
मालिकेतील वाहन क्रमांकासाठी ज्या चारचाकी व दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क (चारचाकींसाठी विहित शुल्काच्या तिप्पट) भरुन हवे असतील त्यांनी बुधवार दिनांक १८ ऑगष्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज व शुल्क रकमेच्या डीडीसह जमा करावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी केले आहे. अर्ज नमूना व आवश्यक क्रमांकासाठी भरावे लागणारे शुल्काची माहिती कार्यालयीन वेळेत १३ ऑगस्ट रोजी उपलब्ध करुन देण्यात येईल. एकाच नंबरकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ पर्यंत कार्यालयीन नोटीसबोर्डवर लावण्यात येणार असून त्या नंबरचे पाकीट लिलाव पध्दतीने वाटप केले जाणार आहे. आरक्षित ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकारजमा होईल. आकर्षक/पसंतीच्या क्रमांकासाठीच्या विहित नमून्यातील अर्ज व मुळ आधार कार्ड व पॅनकार्डसह अर्जदार यांनी कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेमध्ये आवेदन सादर करावे, आशी माहिती बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
--------------------------