गंज पेठेची वेगळी अाेळख करुन देणारे 'गुंदूळ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 04:20 PM2018-04-22T16:20:07+5:302018-04-22T16:20:07+5:30

गंज पेठ या पुण्याच्या दुर्लक्षित पेठेची विविध रुपं सर्वांसमाेर घेऊन येणारे 'गुंदूळ' 'गंज पेठेच्या गल्लीतल्या स्टाेऱ्या' हे फाटाेंचे प्रदर्शन शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंदिराच्या कलादालनात भरविण्यात अाले अाहे.

new view of ganj peth throw gundul photo exibition | गंज पेठेची वेगळी अाेळख करुन देणारे 'गुंदूळ'

गंज पेठेची वेगळी अाेळख करुन देणारे 'गुंदूळ'

पुणे :  पुण्याच्या इतिहासात पुण्यातल्या पेठांना अनन्य साधारण महत्त्व अाहे. येथील राहणीमान, भाषा, खाद्यपदार्थ यांनी या पेठांना एक वेगळी अाेळख मिळवून दिली. परंतु पुण्यातील पेठा म्हंटलं की केवळ सदाशिव, नारायण, शनिवार, कसबा याच पेठा आपल्याला माहित असतात. या पेठांव्यतिरिक्त असलेल्या पेठांकडे अाजपर्यंत फारसे महत्त्व दिले गेले नाही. अशाच पुण्यातल्या जुन्या गंज पेठेची वेगळी बाजू मांडण्यासाठी 'गुंदूळ' 'गंज पेठेच्या गल्लीतल्या स्टाेऱ्या' या नावाच्या फाटाेंचे प्रदर्थनाचे अायाेजन शनिवार पेठेतील सुदर्शन रंगमंच येथील कलादालनात करण्यात अाले अाहे. 
   मधुरा लाेहकरे यांच्या कल्पनेतून हे प्रर्दशन भरविण्यात अाले अाहे. यात केवळ फाेटाे नाहीत तर गंज पेठेतील विविध व्यक्ती, त्यांचे राहणीमान, या पेठेतील व्यवसाय, येथील खानपान त्याचबराेबर येथील भाषा यांचे विविध पैलू उलगडण्यात अाले अाहेत. प्रत्येक फाेटाेसाेबत त्या चित्राची माहिती, फाेटाेतील व्यक्तीची कहाणी सांगण्यात अाली अाहे. मधुरा लाेहकरे यांनी अमेरिकेतल्या एका विद्यापीठाच्या अापल्या पीएचडी साठी गंज पेठ हा विषय निवडला हाेता. त्यात त्यांनी येथील लाेकांचे राहणीमान, त्यांची भाषा, व्यवसाय यांचा अभ्यास केला. त्यानंतर येथील परिस्थिती जवळून अनुभवल्यानंतर येथील नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी तसेच या पेठांकडे ज्या दृष्टिकाेनातून पाहिले जाते ताे दृष्टीकाेल बदलावा यासाठी त्यांनी येथील लाेकांच्या मदतीने हे प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून या पेठांची वेगळी बाजू जगासमाेर मांडण्याचा मधुरा यांचा प्रयत्न अाहे. 


 

  मधुरा यांना या पेठांमधील उच्चशिक्षित अश्या अंगारकी थाेरात, अाश्विनी कदम, प्रणिता कांबळे, प्रिया कांबळे, रेखा थाेरात, सुरेखा शिंदे, मयूर थाेरात, पवन जाधव, राकेश माळी, रुपेश शिंदे यांची साथ मिळाली. त्याचबराेबर चैतन्य माेडक, अनघा घट, क्रिस मेरी कुरिअन यांचेही माेलाचे सहकार्य लाभले. या प्रदर्शनाबाबत बाेलताना मधुरा म्हणाल्या, गंज पेठेचा पीएचडीसाठी अभ्यास केल्यानंतर या पेठेची वेगळी बाजू जगासमाेर अाणायला हवी असे वाटले. त्यामुळे  येथील तरुणांच्या मदतीने या पेठांचे वेगळे रुप दाखविणाऱ्या फाटाेंचे प्रदर्शन भरविण्याचा अाम्ही निर्णय घेतला. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अाम्ही या पेठेतील जीवनशैली, खाद्यपदार्थ, संस्कृती, भाषा सर्वांसमाेर अाणण्याचा प्रयत्न केला अाहे. त्याचबराेबर येथील लाेकांना या प्रदर्शनामुळे एक अात्मविश्वास निर्माण हाेण्यासही मदत हाेणार अाहे.

Web Title: new view of ganj peth throw gundul photo exibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.