नवीन गावांचा महापालिकेवर पडेल भार

By admin | Published: May 29, 2017 03:09 AM2017-05-29T03:09:46+5:302017-05-29T03:09:46+5:30

ज्या भागाला मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत, त्या भागाची आता विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या विकसनशील

The new villages will fall on the Municipal Corporation | नवीन गावांचा महापालिकेवर पडेल भार

नवीन गावांचा महापालिकेवर पडेल भार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : ज्या भागाला मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत, त्या भागाची आता विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या विकसनशील भागातील लोकांना नवीन गावाची स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी इच्छा आहे. नवीन गावे समाविष्ट करून पुणे महापालिकेवर जादा बोजा पडेल. सध्या महापालिकेतअसलेल्या नागरिकांचा विकास होत असताना नवीन गावाच्या सोयी-सुविधांचा भार नको आहे.
हडपसर व इतर काही उपनगरांमधील काही लोकांना नवीन महापालिका नको आहे. पुणे महापालिकेकडून मूलभूत सोयी-सुविधा मिळाल्या आहेत. पुण्यातीलही नागरिकांना सोयी-सुविधा मिळालेल्या आहेत. आतापर्यंत मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी खर्च होत होता. आता कोठे विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. नवनवीन प्रकल्प उभारण्यास सुरुवात झाली आहे. येथील जटिल समस्या व प्रकल्प उभारणीसाठी दरवर्षीच्या पालिकेच्या अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जात आहे. अजून विकास पूर्ण झाला नाही. हा विकास सुरू असताना नवीन गावांना सोयी-सुविधा देण्यासाठी येथील विकास खुंटला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यापेक्षा स्वतंत्र महापालिका केल्यास नवीन महापालिकेचा व सध्या विकसित होणाऱ्या भागाचा स्वतंत्र विकास होईल, अशी अपेक्षा सध्या महापालिकेतील नागरिकांची आहे.

विकसनशील परिसराच्या विकासावर परिणाम
हडपसर, खराडी, मुंढवा, महंमदवाडी, येरवडा अशा उपनगरांतील मूलभूत सुविधा पुणे महापालिकेकडून पूर्णत्वाकडे नेल्या जात आहेत. आता या परिसरात हॉस्पिटल, उद्यान, क्रीडांगण, भाजीमंडई अशा प्रकल्पाची उभारणी होऊन विकास साधण्याचे काम महापालिका करीत आहे, तर ग्रामपंचायतीचा समावेश केल्यास त्याचा भार पालिकेवर पडेल. विकसनशील परिसराच्या विकासावर परिणाम होईल. यापेक्षा नवीन महापालिका होणे या गावांच्या दृष्टीने जसे महत्त्वाचे आहे, तसे पालिकेतील विकसनशील भागातील नागरिकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.

नवीन गावांचा विकास नियोजनबद्ध होईल. त्यासाठी वेगळा निधी राज्यशासन देईलही. मात्र पुणे महापालिकेचा निधीही तिकडे वापरला जाऊ शकतो. त्यामुळे आमच्या परिसराचा विकास खुंटण्याची भीती वाटते.
- सुरेश साबळे, नोकरदार

उपनगरातील नवीन प्रकल्पासाठी मोठ्या निधीची तरतूद केली जात आहे. मात्र दरवर्षीच्या अंदाजपत्रकात थोडा थोडा निधी टाकला जात आहे. यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यास बराच कालावधी जात आहे. अशात नवीन परिसराचा बोजा पडल्यास हे प्रकल्प आणखी लांबणीवर पडतील.
- आनंद काळे, व्यावसायिक

नवीन गावाची स्वतंत्र महापालिकेने स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करता येईल. राज्यशासनाकडून मिळणारा निधी हा पूर्णपणे नव्या महापालिकेच्या बांधणीत वापरता येईल. त्यामुळे त्या निधीत पुणे महापालिकेचा वाटा नको, म्हणून गावच्या भवितव्यासाठी स्वतंत्र पालिका गरजेची आहे.
- सुखदेव पाटील,
ग्रामस्थ, फुरसुंगी

Web Title: The new villages will fall on the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.