नव्या जलवाहिनीला लागली पुन्हा गळती

By admin | Published: May 30, 2017 02:22 AM2017-05-30T02:22:48+5:302017-05-30T02:22:48+5:30

उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून

The new water tank leakage again | नव्या जलवाहिनीला लागली पुन्हा गळती

नव्या जलवाहिनीला लागली पुन्हा गळती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : उजनी जलाशयातून एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या नव्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने एमआयडीसीचापाणीपुरवठा ठप्प झाला आहे. येथील काही शेतकऱ्यांनी जलवाहिनीचा व्हॉल्व्ह तोडून गळती केल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. त्यामुळे बारामती एमआयडीसीतील उद्योगांवर पुन्हा टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी जलवाहिनी जीर्ण झाल्याने गळतीचे प्रमाण अधिक होते. उद्योगांना कायम पाणी टँकरने विकत घ्यावे लागले. त्यामुळे उद्योजकांच्या पाठपुराव्यानंतर २२ कोटी रुपयांची नवीन जलवाहिनी बसविण्यात आली. हे कामदेखील तीन ते साडेतीन वर्षे रखडले होते. मात्र, नवीन जलवाहिनीतूनदेखील गळती सुरू झाल्याने उद्योजकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याची उद्योजकांची तक्रार आहे. दर शुक्रवारी हातोड्याचा वापर करून व्हॉल्व्ह तोडला जातो. शनिवारी, रविवारी एमआयडीसी कार्यालय बंद असते. त्यामुळे दोन ते तीन दिवस पाणी वापरायला मिळते, असादेखील पाणीगळती करणाऱ्यांचा हेतू असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

...पुन्हा पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल
याबाबत बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की सध्या सुरू असलेल्या पाणीगळतीबाबत एमआयडीसी प्रशासन गंभीर नाही.
आज एमआयडीसीच्या
मुख्य अभियंत्यांशी यासंदर्भात संपर्क साधल्यानंतर हालचालींना सुरुवात झाली.
जुन्या जीर्ण जलवाहिनीतून नेहमी गळती होत असे. मात्र, नवीन जलवाहिनीतून गळती सुरू झाली आहे. त्यामुळे हा प्रकार गांभीर्याने न घेतल्यास पुन्हा एमआयडीसीला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.

...एमआयडीसी  प्रशासन हतबल
बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, की गेल्या ४ आठवड्यांपासून हा प्रकार सुरू आहे. एका महिन्यापासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे.
जी झोनमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुुरू आहे. पोंधवडी, पिंपळे येथील काही शेतकऱ्यांकडून हा प्रकार सुरू आहे. पोलीस कारवाई होत नाही. एमआयडीसी प्रशासन हा प्रकार रोखण्यासाठी हतबल आहे.

संरक्षणासाठी पोलीस संरक्षणाची मागणी
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए. के. आगवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की जलवाहिनीतून होणारी गळती थांबविण्यात पूर्णपणे यश आले.
पाणीगळतीला कारणीभूत असणाऱ्यांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यासह बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. जलवाहिनीसाठी पोलीस संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: The new water tank leakage again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.