नवीन वर्षात ‘स्वरभास्करा’च्या जन्मशताब्दीवर्षास प्रारंभ; वर्षभर विविध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:12 AM2020-12-31T04:12:53+5:302020-12-31T04:12:53+5:30
''''''''ख्याल यज्ञ'''''''' हा महोत्सव १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान रंगणार लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी ...
''''''''ख्याल यज्ञ'''''''' हा महोत्सव १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान रंगणार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘स्वरभास्कर’ पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नवीन वर्षात प्रारंभ होणार आहे. त्यानिमित्त संगीताचार्य द. वि. काणेबुवा प्रतिष्ठानतर्फे ४ फेब्रुवारी २०२१ ते ३ फेब्रुवारी २०२२ या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.
पं. भीमसेन जोशी यांच्या जयंतीदिनी (४ फेब्रुवारी) गदग या त्यांच्या जन्मगावापासून जन्मशताब्दीच्या कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे. याच मालिकेतील ‘ख्याल यज्ञ’ हा महोत्सव १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार असल्याची माहिती भारतरत्न पं. भीमसेन जोशी जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आणि खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी दिली.
संगीत महोत्सवाला ४ फेब्रुवारी २०२१ रोजी सुरुवात होईल. पंडितजींनी ख्याल गायकीला मानाचे स्थान मिळवून दिल्याने तसेच पंडितजींची कारकीर्द पुण्यात घडल्यामुळे १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये सकाळी ७ ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या ‘ख्याल यज्ञ’ महोत्सवात देशातील दिग्गज तसेच नवोदित कलाकारांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन १३ फेब्रुवारी २०२१ रोजी ख्यातनाम बासरी वादक पं. हरिप्रसाद चौरासिया आणि ख्यातनाम गायक पं. राजन व साजन मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पुण्यात होणाऱ्या विशेष सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याची विनंती बापट यांनी केली आहे.