कोये येथे भरपावसात नवजात अर्भकाला सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:13 AM2021-08-15T04:13:32+5:302021-08-15T04:13:32+5:30

कोये (ता. खेड) येथे रात्री ३ ते ४ च्या सुमारास कोणीतरी स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडून दिले. अर्भकाच्या रडण्याचा ...

A newborn baby was left in the rain at Koye | कोये येथे भरपावसात नवजात अर्भकाला सोडले

कोये येथे भरपावसात नवजात अर्भकाला सोडले

Next

कोये (ता. खेड) येथे रात्री ३ ते ४ च्या सुमारास कोणीतरी स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडून दिले. अर्भकाच्या रडण्याचा आवाज येथील उषाबाई हिरामण राळे यांना आला. त्यांनी पोलीस पाटील साहेबराव राळे यांना ही बाब कळविली. यानंतर पोलीस पाटील राळे व ग्रामस्थ मानद राळे, उपसरपंच सागर राळे, गोविंद राळे, पोपट राळे यांनी हे अर्भक पाईट प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. नवजात अर्भकाच्या जन्म चार तासांपूर्वी झाला असल्याचा अंदाज आरोग्य अधिकारी अश्विनी कांबळे यांनी वर्तविला. याबाबत पोलीस पाटील साहेबराव राळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

फोटो : कोये येथे सापडलेलेल्या नवजात अर्भकासोबत ग्रामस्थ व आरोग्य अधिकारी कांबळे.

Web Title: A newborn baby was left in the rain at Koye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.