कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात ग्रामपंचायतींचा कारभार हाताळताना नवनियुक्त प्रशासकांची होणार दमछाक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:25 PM2020-09-04T12:25:25+5:302020-09-04T12:26:06+5:30
नेमलेल्या प्रशासकाकडे केवळ एकच ग्रामपंचायत नाही तर सात-आठ ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळायचा आहे.
राजगुरुनगर: खेड तालुक्यात ८३ ग्रामपंचायतीवर पंचायत समितीच्या विविध विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या नियुक्ति आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे. नियुक्त विस्तार अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचा प्रशासक म्हणुन पदभार स्विकारण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामपंचायतीवर नेमण्यात आलेल्या प्रशासकांना पंचायत समितीचा आपल्या विभागातील कामकाज सांभाळून ग्रामपंचायतीना भेटी देणे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणासाठी अंतर आणि वेळेचा विचार करता दमछाक होणार आहे.
तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता कोरोनाचा प्रादुर्भावही तालुक्यात वाढत चालला आहे. १०० हून अधिक गावांत बाधित आढळत आहे. दिवसेंदिवस ही आकडेवारी वाढत चालली असून ती रोखण्याचे काम करत असतानाच गावकारभाऱ्यांना आता पायउतार व्हावे लागले आहे. नेमलेल्या प्रशासकाकडे केवळ एकच ग्रामपंचायत नाही तर सात-आठ ग्रामपंचायतींचा कारभार सांभाळायचा आहे. याशिवाय पंचायत समितीत ज्या विभागात हे प्रशासक काम करत आहे तेही त्यांना साभाळायचे आहे. एकूणच कामाचा अतिरिक्त ताण या प्रशासकांना देण्यात आल्यामुळे कोरोना काळात गावकारभार कसा पाहणार हे महत्वपूर्ण ठरणार आहे.
तालुक्याचे पुर्व आणि पश्चिम असे विभाजन होत असते. प्रशासकांची नियुक्ती करताना एकाच रस्त्यावर अथवा एका परिसरातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर करण्याएवजी पूर्वेकडील काही गावे आणि पश्चिमेकडील काही गावे अशी गावे देण्यात आली आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या दळणवळणामध्येच प्रशासकांचा जास्तीत जास्त वेळ जाणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये ग्रामपंचायतीकडून राबविण्यात उपाययोजनांवरही त्याचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. एकूणच प्रशासकांकडे दिलेल्या ग्रामपंचायती पाहिल्या तर त्यांची गळचेपी केली असून कामाचा बट्ट्याबोळ होणार हे मात्र निश्चितच आहे.
...
राजकीय लाभासाठी इच्छूकांची धडपड
कोरोनाकाळातच ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले आहे़. त्यांच्याकडे सात-आठ ग्रामपंचायती असून अतिरिक्त कामाचा ताणही वाढत आहे. त्यामुळे गावातील उपाययोजनावर काम कसे होणार हा प्रश्न होता. मात्र, आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी इच्छूकांनी आतापासूनच आखणी करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या वॉर्डात निर्जंतुकीकरण यासंह अन्य उपाययोजना स्वत:हून राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ही कामे इच्छुकांच्या पत्त्यावर पडणार हे मात्र नक्की आहे.
...
नेमलेले प्रशासक आणि ग्रामपंचायती
१) एस.एन. मंहकाळे: रानमळा, वडगाव पाटोळे, वेताळे, साबुर्डी, दोंदे, कडुस, कडध़े़
२) बाळासाहेब ओव्हाळ: कुरकुंडी, किवळे, चांदुस, तोरणे बु., चिबंळी, शेलु, पिपंरी बु., आसखेड खु., कोरेगाव बु., तळवडे, गोनवडी, बिरदवडी़
३) एस.बी.कारंडे: चांडोली, कनेरसर, पाडळी, पागंरी, खराबवाडी, कुरुळी, चिंचोशी, निमगाव, जऊळके बु., खरपुडी बु., वाकी खु.
४) ए.एन.मुल्ला: नाणेकरवाडी, भोसे, दावडी, रेटवडी़
५) एस.डी.थोरात: वासुली, सावरदरी, वराळे, म्हाळूंगे, कान्हेवाडी तर्फे चाकण, अहिरे, हेद्रुज, गडद, पाळु, मेदनकरवाडी, शिंदे, सांगुर्डी, करंजविहिरे, शिवे़
६) जी.पी.शिंदे: गोलेगाव, रासे, धानोरे, केळगाव, खरपुडी खु., विºहाम, औदर, मोई, कोयाळी तर्फे चाकण, मरकळ, चºहोली खु., वाफगाव़
७) जीवन कोकणे: कान्हेवाडी बु., चिंचबाईवाडी, पुर, तुकईवाडी, मोहकल, वाकळवाडी, गोसासी, काळुस, कमान, खरोशी, टोकावडे, भोरगिरी़
८) बाळकृष्ण कळमकर: टाकळकरवाडी, वरची भाबुंरवाडी, येणिये बु., वांद्रा, औंढे, वाजवणे, कुडे खु., कळमोडी, आंबोली, घोटवडी़