नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १२ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:07+5:302021-02-08T04:11:07+5:30

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हे शुक्रवारी १२ ...

Newly appointed Congress state president Nana Patole will assume office on February 12 | नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १२ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार

नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १२ फेब्रुवारीला पदभार स्वीकारणार

Next

पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष तसेच उपाध्यक्ष हे शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली आहे.

१९४२ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातून भारत छोडो हा नारा देत स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात केली होती. त्याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रांताध्यक्ष, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व जेष्ठ नेते, राज्य मंत्रीमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Newly appointed Congress state president Nana Patole will assume office on February 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.