गर्भपातास नकार देणाऱ्या नवविवाहितेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 01:24 AM2018-09-29T01:24:06+5:302018-09-29T01:24:20+5:30

माहेरहून पैसे व दागिने आणत नाही, तसेच गर्भपातासही नकार देणा-या नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Newly married murderer refusing abortion | गर्भपातास नकार देणाऱ्या नवविवाहितेचा खून

गर्भपातास नकार देणाऱ्या नवविवाहितेचा खून

Next

निरगुडसर - माहेरहून पैसे व दागिने आणत नाही, तसेच गर्भपातासही नकार देणाºया नवविवाहितेला राहत्या घरात सासरच्या लोकांनी फाशी देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना पेठ (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) घडली. याप्रकरणी मंचर पोलिसांनी सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पूनम स्वप्निल ढमाले (वय २५) असे झालेल्या विवाहितेचे नाव आहे. पती स्वप्निल भरत ढमाले, सासू संगीता भरत ढमाले, सासरे भरत ढमाले, दिर निखिल भरत ढमाले, सुमित भरत ढमाले यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पूनम ही विज्ञान शाखेची पदवीधर व पती स्वप्निल बारावी शिकलेला. त्याची पेठ येथे चायनीजची गाडी आहे. दोघांमध्ये प्रेम होते. तिच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता. तिच्या आई-वडिलांचा विरोध असतानाही ७ महिन्यांपूर्वी दोघांनी विवाह केला. एका महिन्याने तिच्या आई-वडिलांची सहमती मिळाल्यानंतर आळंदीत नातेवाईकांच्या उपस्थितीत पुन्हा विवाह केला. लग्नानंतर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. तिला वारंवार मारहाण करून माहेरून पैसे व दागिने घेऊन ये, असा तगादा लावला होता. त्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केला होता. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला जात होता, अशी माहिती तपासात पुढे आल्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सांगितले.
गुरुवारी (ता. २७) सकाळी दहा वाजण्यापूर्वी तिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. वडील शाम भीमाजी सैद (रा. महाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव) यांना घटना समजताच ते मंचर पोलीस ठाण्यात आले. ‘‘माझी मुलगी कधीही आत्महत्या करणार नाही. सासरच्या लोकांनी पूनमचा गळा दोरीने आवळून तिला ठार केले आहे,’’ अशी फिर्याद नोंदविली.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी भेट दिली. मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात गुरुवारी रात्री शवविच्छेदन करण्यात आले. तिला फाशी दिल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे. मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर तिच्यावर माहेरी महाळुंगे पडवळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांचाळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Newly married murderer refusing abortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.