बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:19 AM2021-02-06T04:19:17+5:302021-02-06T04:19:17+5:30

पुणे: अखिल भारतीय युवक मराठा पुणे शहर तर्फे वाकडेवाडी येथे संघटनेचे अध्यक्ष अनिल मारणे आणि अखिल मंडई मंडळाचे खजिनदार ...

News | बातम्या

बातम्या

Next

पुणे: अखिल भारतीय युवक मराठा पुणे शहर तर्फे वाकडेवाडी येथे संघटनेचे अध्यक्ष अनिल मारणे आणि अखिल मंडई मंडळाचे खजिनदार संजय मते पाटील यांच्या हस्ते शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दत्तात्रय गायकवाड, युवक अध्यक्ष युवराज दिसले, उद्योजक सौरभ अमराळे, दिनेश बोरकर, आदी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांना गायकवाड यांच्या हस्ते तुळस रोप देऊन सन्मानित करण्यात आले.

महाविद्यालय विद्यार्थ्यांनी गजबजले

पुणे: पुणे विद्यार्थी गृहाचे महाराष्ट्र विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून उत्साही स्वागत करण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर नऊ महिन्यांपासून बंद असलेले विद्यालय विद्यार्थ्यांच्या आगमनाने पुन्हा एकदा गजबजले. सर्व शासकीय नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून प्रवेशद्वारापासूनच सॅनिटायजर स्टँड, तापमान तपासणी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना वर्गात सुरक्षित अंतरावर बसवण्याची सोय करण्यात आली होती. यावेळी चौधरी, मिरखलकर, गावडे, कसबे, राठोड, चंदनशिवे या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

गझलसंग्रहाचे प्रकाशन

पुणे: करते थोडी स्वप्ने गोळा, स्वप्नांचे वय कायम सोळा अशा बहारदार गझल लिहिणाऱ्या डॉ माधुरी चव्हाण जोशी या उत्तम गझलकारा आहेत. असे मत गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी व्यक्त केले.

संवेदना प्रकाशन आयोजित गझलकारा डॉ माधुरी चव्हाण जोशी यांच्या मधूपट या गझलसंग्रहाच्या प्रकाशन सोहळयात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे गझलकार मधुसूदन नानिवडेकर, संवेदना प्रकाशनाचे नितीन हिरवे, नरेंद्र गिरीधर, आदी उपस्थित होते.

Web Title: News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.