बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:23 AM2021-02-21T04:23:37+5:302021-02-21T04:23:37+5:30
पुणे : कोकणस्थ परिवाराच्या वतीने देण्यात येणारा भाई नेवरेकर जीवनगौरव पुरस्कार फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी क्रीडा संचालक प्रा. शाम करंदीकर ...
पुणे : कोकणस्थ परिवाराच्या वतीने देण्यात येणारा भाई नेवरेकर जीवनगौरव पुरस्कार फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी क्रीडा संचालक प्रा. शाम करंदीकर यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ २५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील ईफा होम सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार हॅरी डेव्हिड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. विजय सावंत उपस्थित राहणार आहेत.
शाम करंदीकर यांनी गेल्या ४० वर्षांत क्रीडासंचालक पदाच्या कारकिर्दीत मुष्ठियुद्ध, कबड्डी, मल्लखांब, कुस्ती, स्विमिंग क्षेत्रात मार्गदर्शन करून राष्ट्रीय स्तरावर अनेक क्रीडापटू घडवले आहेत.
................
म्हस्के कुटुंबीय देणार सामाजिक संस्थांना देणगी
पुणे: अभियंता भास्करराव म्हस्के यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार धार्मिक विधींना फाटा देऊन सामाजिक संस्थांना म्हस्के कुटुंबीय देणगी देणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. पुण्यातील कॉर्न क्लबचे ते संचालक होते. रस्ते, धरणे गृहनिर्माण आदी कामे त्यांनी केली. तसेच नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. पाणी, शेती क्षेत्रात लिखाणही केले आहे.