देशातील वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद - प्रतिभाताई पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:03 AM2018-04-16T03:03:16+5:302018-04-16T03:03:16+5:30

संरक्षणासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतो. अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावतो. समाजात राहत असताना येणाऱ्या विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी शासनाकडे दाद मागतो. मात्र यापैकी कुणाकडूनही दखल न घेतली गेल्यास लोक आपले गा-हाणे वृत्तपत्रांकडे मांडतात. त्यामुळे वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.

Newspapers in the country are the real strength of democracy - Pratibhatai Patil | देशातील वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद - प्रतिभाताई पाटील

देशातील वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद - प्रतिभाताई पाटील

Next

पुणे - संरक्षणासाठी आपण पोलिसांकडे धाव घेतो. अन्यायाच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावतो. समाजात राहत असताना येणाऱ्या विविध प्रश्नांच्या उत्तरासाठी शासनाकडे दाद मागतो. मात्र यापैकी कुणाकडूनही दखल न घेतली गेल्यास लोक आपले गा-हाणे वृत्तपत्रांकडे मांडतात. त्यामुळे वृत्तपत्रे ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे मत माजी राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र संपादक परिषद आयोजित पत्रकारिता साहित्यगौरव पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारार्थींच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब कोयटे कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित होते. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर अध्यक्षस्थानी होते़ परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, कार्याध्यक्ष रमेश खोत, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये व्यासपीठावर उपस्थित होते.
ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच न्यूज १८ लोकमतचे दिनेश केळुस्कर (स्व. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार), अशोक वानखेडे (दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार), नीला खोत (लोकमान्य टिळ्क स्मृती पुरस्कार), नवनाथ दिघे (विष्णूशास्त्री चिपळूणकर स्मृती पुरस्कार), राजेश जगताप (आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार), शौकतअली मिरसाहेब (प्रबोधनकार ठाकरे स्मृती पुरस्कार), संदीप आचार्य (गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार), देवेंद्र पळणीटकर (भुरीबाई केसरीमलजी जैन पुरस्कार) आदी मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, समाजातील अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्यासाठी वृत्तपत्रांना पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे लोकशाहीत वृत्तपत्रांच्या जबाबदाºयांना अधिक महत्त्व आहे. प्रकाश पोहरे म्हणाले, ‘आपल्यामधला पत्रकार कधीही मरू न देणे, ही काळजी संपादकाला घ्यावी लागते़ संपादकपद सांभाळणे आव्हानात्मक असून नवीन पिढीने या क्षेत्रात येताना पुरेशी तयारी करणे गरजेचे आहे़’
सर्व पुरस्कारविजेत्या पत्रकार, संपादकांना शुभेच्छा देऊन विजय बाविस्कर यांनी पत्रकारितेचा गाभा आणि गाभारा शाबूत ठेवण्याचे आवाहन केले़
पुरस्कारविजेत्यांच्या वतीने संदीप आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले़ प्रा. हेमंत सामंत यांनी सूत्रसंचालन केले.
 

Web Title: Newspapers in the country are the real strength of democracy - Pratibhatai Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.