येत्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 08:39 PM2018-05-31T20:39:38+5:302018-06-01T05:35:06+5:30

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे.

In the next 48 hours possibility of torrential rains in Marathwada with south Maharashtra | येत्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता 

येत्या ४८ तासात दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता 

Next
ठळक मुद्देमान्सूनची वेगाने वाटचाल : कर्नाटकपर्यंत मजलगोव्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : कोकण गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात कमालीचा उकाडा जाणवत आहे. येत्या ४८ तासात दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, मॉन्सूनची वेगवान वाटचाल सुरू असून कर्नाटकपर्यंत मजल मारली आहे. 

राज्यात सूर्य आग ओकत असून, विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. उद्या (शुक्रवार) ला गोव्यासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या चोवीस तासात कोकण, गोवा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला. 

दरम्यान, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागारात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सूनची वाटचाल वेगाने सुरू आहे. केरळच्या आगमनानंतर कर्नाटकातील म्हैसूर कोडार्ईकँनल, तुतीकोरीन मध्ये मान्सूनने प्रवेश केला आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांमध्ये आगेकूच करण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. अंदमान, निकोबार, कर्नाटक किनारपट्टी, कोकण-गोवा, तामिळनाडू तसेच आसाम, मेघालय, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्यप्रदेश, विदर्भ मध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


 
 
 

Web Title: In the next 48 hours possibility of torrential rains in Marathwada with south Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.