पुढील शैक्षणिक वर्ष लांबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:12 AM2021-01-22T04:12:09+5:302021-01-22T04:12:09+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.मात्र,आता फेब्रुवारी- मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यात होणार आहेत.कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षावर परिणाम झाला.परंतु,याच वर्षी नाही तर पुढील वर्षात राबविण्यात येणाऱ्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुद्धा लांबणार आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न राज्य मंडळातर्फे केला जाणार आहे.त्यामुळे विविध सीईटी परीक्षा विचारात घेऊन बारावीच्या परीक्षांचे व निकालाचे नियोजन केले आहे,असे सूत्रांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. तसेच निकाल वेळेवर जाहीर व्हावा,या उद्देशाने राज्य शिक्षण मंडळातर्फे उपाय योजना राबविल्या जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा व निकालाची काळजी न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मंडळाच्या अधिका-यांनी केले आहे.