कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु करायला लागणार आणखी ३ महिने: आरोग्यमंत्री राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 07:46 PM2021-03-22T19:46:55+5:302021-03-22T19:47:45+5:30
मुंबई, पुणे , नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
पुणे: राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची जोरदार मोहीम सुरू आहे. रोज सरासरी ३ लाख लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत जवळपास ४५ लाख लसीकरण पूर्ण झाले आहे. मात्र,आत्ता सुरु असलेला ४५ वर्षां पुढच्या आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.
दरम्यान, सरसकट लसीकरणाची मागणी असली तरी केंद्राच्या धोरणाप्रमाणेच आम्ही अंमलबजावणी करत आहोत असेही यावेळी टोपे म्हणाले.
पुण्यात राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी कोरोना परिस्थितीवर भाष्य केले. टोपे म्हणाले,
आजमितीला राज्यात २ लाख १० हजार सक्रिय रुग्ण असून त्यापैकी
८५ टक्के लक्षण विरहित आहे. ०.४ टक्के मृत्युदर आहे. आजमितीला पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत. मात्र वाढती संख्या लक्षात घेता आणखी तयारी करावी लागणार आहे.
मुंबई, पुणे , नागपूर सारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या लागू असलेल्या निर्बंधांचे सक्तीने अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. कोविशिल्ड लसीकरणा दरम्यानच्या दोन डोसांमध्ये ४५ ते ६० दिवसांचे अंतर ठेवण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीची टक्केवारी कमी....
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची रुग्ण वाढीची टक्केवारी कमी आहे. आपली ८० टक्के असेल तर इतर ठिकाणी २०० टक्के आहे.
खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांसाठी ८० टक्के खाटा ठेवण्यात येतील. तसेच डॅशबोर्ड नियमितपणे अपडेट केला जाईल. याचवेळी रुग्णांना वेळेत उपचार मिळेल याला प्राधान्य देणार असल्याचे देखील
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री