पुण्यातील पीएफआय कार्यालयावर एन आय ए चे छापे; तर एटीएसच्या कारवाईत दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 10:04 AM2022-09-22T10:04:25+5:302022-09-22T10:14:14+5:30

देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे

NIA raids PFI office in Pune Two members arrested | पुण्यातील पीएफआय कार्यालयावर एन आय ए चे छापे; तर एटीएसच्या कारवाईत दोघांना अटक

पुण्यातील पीएफआय कार्यालयावर एन आय ए चे छापे; तर एटीएसच्या कारवाईत दोघांना अटक

Next

पुणे : देश विघातक कृत्य केल्याप्रकरणी नाशिक येथे PFI या संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल आहे. त्याच अनुषंगाने आज पहाटे पुण्यातील कोंढवा येथे दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत PFI संघटनेच्या पूर्वाश्रमीच्या दोन सदस्यांना अटक केली. कयूम शेख आणि रजी अहमद खान अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पुण्यातील कार्यालयावर एन आय ए ने छापा मारण्यात आला आहे. त्याचबरोबर केरळमधील पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओमा सलाम, राष्ट्रीय सचिव यांच्या ठिकाणांवरही छापे मारण्यात आले आहेत. संस्थेने टेरर फंडींग, संघटनेतील सुरू असलेली ट्रेनिंग या सर्व विषयी चौकशी करण्यासाठी पुण्यातील कोंढवा येथे असणाऱ्या कार्यालयावर छापे मारण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव सी आर पी एफ ची एक तुकडी पुण्यात दाखल झाली असून देशातील अनेक शहरात आज सकाळपासून छापेमारी सुरू झाली आहे. 

पीएफआय ही केरळमध्ये कार्यरत असलेली कट्टर इस्लामिक संघटना आहे. 1993 मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून PFI ची स्थापना झाली. 1992 मध्ये बाबरी मशीद कोसळल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी नावाची संघटना स्थापन झाली. 

Web Title: NIA raids PFI office in Pune Two members arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.