कार्ड क्लोनिंग प्रकरणी नायजेरियन आरोपींना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:59+5:302021-05-05T04:17:59+5:30

पुणे : एटीएम मशीन सोबत छेडछाड करत कार्ड क्लोनिंग यंत्राच्या आधारे बनावट कार्ड तयार केले. तसेच फिर्यादीच्या खात्यातील ...

Nigerian accused in card cloning case remanded in police custody | कार्ड क्लोनिंग प्रकरणी नायजेरियन आरोपींना पोलीस कोठडी

कार्ड क्लोनिंग प्रकरणी नायजेरियन आरोपींना पोलीस कोठडी

Next

पुणे : एटीएम मशीन सोबत छेडछाड करत कार्ड क्लोनिंग यंत्राच्या आधारे बनावट कार्ड तयार केले. तसेच फिर्यादीच्या खात्यातील १ लाख १० हजार रूपयांची रक्कम काढून घेणाऱ्या नायजेरियन आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना ५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बशीर उर्फ लुकास विल्यम उर्फ ओमईके गॉडसन (वय ३१ जगताप डेअरी, रहाटणी) आणि इनाम गॅब्रिअल चुकेव्हबुका (शारदा कॉलनी, पिंपळे निलख, दोघे मूळ नायझेरिया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पांडुरंग कंद (वय ४०, रा. लोणीकंद) यांनी फिर्याद दिली आहे. नाशिक फाटा कासारवाडी येथील एटीएम सेंटरमध्ये २५ ते २८ एप्रिल या दरम्यान हा गुन्हा घडला.

दरम्यान, दुसऱ्याच्या नावे असलेले सीमकार्डचा वापर आरोपी इनाम चुकेव्हबुका याच्याकडे सापडलेल्या आयफोनमधील मोबाईल क्रमांक हा लुकास विल्यमस या नावाने रजिस्टर असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यातील आरोपी चुकेव्हबुका याला यापूर्वी २०२० मध्ये सायबर गुन्ह्यांत अटक केली होती. त्यानंतर जामीनावर बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. पोलीस आरोपींना मदत करणाऱ्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कार्ड क्लोनिंगसाठी वापरण्यात येणारे कार्ड रीडर मशीन, वेगवेगळ्या बँकांचे १० एटीएम कार्ड, लाल आणि काळ्या रंगाचे चिकटटेप आदी साहित्य जप्त केले आहे. आरोपींकडे मिळून आलेले विविध बँकाचे एटीएम कार्ड त्यांनी कोठून आणले, जप्त केलेल्या एटीएम कार्डमधील कोणत्या खातेधारकाचा डेटा आरोपींनी क्लोन केला आहे तसेच आणखी किती लोकांची फसवणूक केली, फिर्यादींच्या खात्यावरून काढलेली रक्कम जप्त करणे, अशाप्रकारे पुण्यासह भारतातील इतर भागातही गुन्हे केल्याची शक्यता असून त्या संदर्भात तपास करण्यासाठी आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.

दरम्यान, दुसऱ्याच्या नावे असलेले सीमकार्डचा वापर आरोपी इनाम चुकेव्हबुका याच्याकडे सापडलेल्या आयफोनमधील मोबाईल क्रमांक हा लुकास विल्यमस या नावाने रजिस्टर असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच यातील आरोपी चुकेव्हबुका याला यापूर्वी २०२० मध्ये सायबर गुन्ह्यांत अटक केली होती. त्यानंतर जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हा केला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. पोलीस आरोपींना मदत करणाऱ्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.

Web Title: Nigerian accused in card cloning case remanded in police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.