नायजेरियन अटकेत
By admin | Published: December 22, 2016 02:44 AM2016-12-22T02:44:58+5:302016-12-22T02:44:58+5:30
कोकेन विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या एका नायजेरियन तरुणाला दरोडाप्रतिबंधक पथकाने साधुवासवानी चौक येथून सापळा
पुणे : कोकेन विक्री करण्यासाठी बाळगणाऱ्या एका नायजेरियन तरुणाला दरोडाप्रतिबंधक पथकाने साधुवासवानी चौक येथून सापळा रचून अटक केली असून त्याच्याकडून १ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे १४ ग्रॅम २०० मिलीग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे़
लेवी मडुक्वे (वय ३७, रा़ मूळ नायजेरिया, सध्या मीरा रोड, ठाणे) असे त्याचे नाव आहे़ याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांनी सांगितले, की साधुवासवानी चौक येथील विजय सेल्ससमोर एक तरुण कोकेन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले व पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली होती. याबाबतची अधिक माहिती मिळवून दरोडाप्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी साधुवासवानी चौैक येथे सापळा रचून सोमवारी रात्री छापा टाकला. त्या वेळी नायजेरियन लेवी मडुग्वे याच्याजवळ पोलिसांना १ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे १४ ग्रॅम २०० मिली वजनाचे कोकेन मिळून आले.
पोलिसांनी कोकेन जप्त करून त्याच्याविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील, गुन्हे शाखा दोनचे सहायक आयुक्त अरुण वालतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडाप्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, सहायक पोलीस फौजदार दीपक निकम, कर्मचारी शैलेश जगताप, संतोष पगार, अनंत दळवी, किरण लांडगे, परवेज जमादार, मल्लिकार्जुन स्वामी, संदीप होळकर, धनाजी पाटील यांच्या पथकाने केली.