Video: रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड; बुलेटबाजांचा धुडगस, फटाक्यांच्या आवाजाने पुणेकर त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:04 IST2025-03-19T13:03:04+5:302025-03-19T13:04:42+5:30
बुलेटच्या फटाक्याच्या आवाजाने सर्वसामान्य नागरिक घाबरतात, लहान मुले महिला आवाजामुळे दचकतात, परिणामी अपघाताची शक्यता असते

Video: रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड; बुलेटबाजांचा धुडगस, फटाक्यांच्या आवाजाने पुणेकर त्रस्त
किरण शिंदे
पुणे: बुलेटच्या फटाक्यांचा धडाधड आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकीमुळे वाघोलीकर त्रस्त झाले आहेत. रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड आवाज करत जाणाऱ्या या बुलेटबाजांमुळे पादचारी आणि विशेषतः जेष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहतूक पोलिसांनी वाघोली परिसरात रात्री अपरात्री धुडगूस घालणाऱ्या या बुलेटबाजांना आवर घालावा अशी मागणी नागरिक करताना दिसत आहेत.
प्रत्यक्षात बुलेट ही आकर्षक दुचाकी.. रस्त्याने धडधड करत धावणारी बुलेट अनेकांची लक्ष वेधून घेते.. मात्र मागील काही वर्षांपासून बुलेट ही वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.. या बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बदल करून अनेक टवाळखोर तरुण फटाक्यांचा आवाज काढतात. रस्त्याने जाणाऱ्या या अशा दुचाकीमुळे सर्वसामान्य नागरिक घाबरतात, लहान मुले महिला अचानक येणाऱ्या या आवाजामुळे दचकतात. परिणामी अपघाताची शक्यता असते.. त्यामुळे अशा फटाके फोडणाऱ्या बुलेट बाजार वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यातील वाघोली परिसरात अशाच या बुलेटबाजांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. रात्री अपरात्री ही टार्गेट मुलं घोळक्याने बुलेट घेऊन येतात आणि फटाक्यांच्या आवाजाने रात्रीची शांतता भंग करतात. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र पोलीस या बुलेटबाजांना आवर घालण्यात कमी पडताना दिसत आहेत.
रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड आवाज; बुलेटबाजांचा धुडगस, फटाक्यांच्या आवाजाने पुणेकर त्रस्त#Pune#bulet#Police#citizenspic.twitter.com/AbmtKOGCtX
— Lokmat (@lokmat) March 19, 2025
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुणे वाहतूक पोलिसांनी बुलेट गाडीचे सायलेन्सर मॉडीफाय करून कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्यांवर कारवाई केली होती. १७६८ बुलेटच्या मॉडीफाय सायलेन्सर वर बुलडोजर फिरवला होता. मात्र असं असलं तरीही ही मोहीम आणखी तीव्र करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.