रात्रीस चाले खेळ ‘घरफोड्यांचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:32 AM2019-03-01T01:32:42+5:302019-03-01T01:32:44+5:30

गतवर्षी ६०० घरफोड्या : कोथरूड-वारजे माळवाडीत रात्रीच्या, तर हडपसर, कोंढव्यात सर्वाधिक घटना

The night game will be 'Ghalophoda' | रात्रीस चाले खेळ ‘घरफोड्यांचा’

रात्रीस चाले खेळ ‘घरफोड्यांचा’

Next

पुणे : अत्याधुनिक सोयीसुविधा, त्याला माहिती व तंत्रज्ञानाची जोड देत गुन्ह्याचा प्रभावीपणे शोध घेण्यास सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या पुणे पोलीस प्रशासनासमोर येत्या काळात घरफोड्या रोखण्याचे मोठे आव्हान आहे. शहरातील कोथरूड आणि वारजे माळवाडीत रात्रीच्या, तर हडपसर, कोंढवा भागात दिवसा सर्वाधिक संख्येने घरफोड्या झाल्यास दिसून आले आहे. मागील वर्षी तब्बल एकूण ६०० घरफोड्यांचे गुन्हे दाखल केले आहे. यात दिवसा १३६ तर रात्री ४६४ घरफोड्या, तर २०१७ मध्ये हे प्रमाण ७५३ इतके होते. यात २१४ घरफोड्या दिवसा तर ५३९ घरफोड्या रात्रीच्या वेळी आहेत.


कोथरूड, वारजे माळवाडी, उत्तमनगर, सिंहगड रस्ता, दत्तवाडी या परिसरात रात्रीच्या वेळी १११ घरफोड्या झाल्या आहेत. यापैकी केवळ ४५ गुन्हे उघड झाले आहेत. २०१७ काळात या भागात १३० घरफोड्यांचे गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ७० गुन्हे उघड झाले होते. दिवसा घरफोड्यांमध्ये हडपसर आणि कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भरदिवसा तिथे होणाऱ्या मोठ्या घरफोड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मागील वर्षी या परिसरात दिवसा ५० घरफोड्यांचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी २७ गुन्हे उघड झाले. २०१७ मध्ये ५४ दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झाले तर त्यापैकी ३० गुन्ह्यांची उकल करण्यात आली.


पुणे शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये दिवसा घरफोडीचे १३६ गुन्हे, तर ४६४ रात्रीच्या घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी अनुक्रमे ६१ व २११ गुन्हे उघड झाले असून, घरफोडीच्या गुन्हे उघड होण्याची टक्केवारी ४५ टक्के असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रशासनाकडून प्रभावीपणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. हडपसर, कोंढवापाठोपाठ चतु:शृंगी आणि चंदननगर भागात देखील मोठ्या प्रमाणात दिवसा घरफोड्या होत आहेत. दिवसा २८ घरफोड्यांची नोंद या भागात झाली
असून, त्यापैकी १२ गुन्हे उघड झाले आहेत.


केवळ रात्रीच्याच नव्हे तर दिवसांच्या घरफोडीच्या बाबत कोथरूड, वारजे माळवाडी आणि सिंहगड रस्ता परिसरातील नागरिक अधिक चिंतेत आहेत.
या परिसरात ३५ घरफोड्या झाल्या. २०१७ मध्ये हे प्रमाण ७७ इतके होते. त्यापैकी ५६ गुन्हे उघड झाले. मात्र २०१८ मधील ३५ गुन्हयांपैकी केवळ १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होत आहे. शहरातील डेक्कन, शिवाजीनगर, स्वारगेट, कोरेगाव पार्क भाग तुलनेने अधिक सुरक्षित असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे.

१० ते १५ किमीच्या अंतरात घरफोड्या
रात्रीच्या वेळी उशिरापर्यंत पोलीस शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये गस्त घालत असतात. असे असताना देखील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. मुख्य शहरापासून किमान १० ते १५ किमीच्या परिसरात घरफोड्या होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. एकीकडे नवनवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन पोलीस प्रशासनाला हायटेक करू पाहणाºया पोलीस प्रशासने घरफोड्यांचे प्रमाण कसे रोखता येईल याचा गांभीर्याने विचार करावा, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून दिल्या जात आहेत.

सीसीटीव्ही बसवण्याची मागणी
भविष्यात घरफोड्यांचे प्रमाण आटोक्यात आणण्याकरिता शहराच्या ज्या परिसरातून सर्वाधिक प्रमाणात घरफोड्या होत आहेत, त्या भागातील जवळच्या एखाद्या रस्त्यावर, सिग्नलवर, याशिवाय चौकातील मुख्य ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सीसीटीव्ही बसविण्याची योजना नागरिकांमधून पुढे येत आहे.

Web Title: The night game will be 'Ghalophoda'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.