रात्रभर चोरट्यांचा धुमाकूळ, कामशेतमध्ये सहा दुकाने फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:54 AM2018-03-16T00:54:48+5:302018-03-16T00:54:48+5:30
बाजारपेठेतील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकानांचे शटर उचकटून चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. रात्री एका दुकानदाराने या संबंधी दुकानाचे शटर अज्ञात चोरटे तोडत असल्याबाबत फोनवर कामशेत पोलीस ठाण्यात कळवूनही संबंधित ठाणे अंमलदाराने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला.
कामशेत : येथील बाजारपेठेतील पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सहा दुकानांचे शटर उचकटून चोरी झाल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. रात्री एका दुकानदाराने या संबंधी दुकानाचे शटर अज्ञात चोरटे तोडत असल्याबाबत फोनवर कामशेत पोलीस ठाण्यात कळवूनही संबंधित ठाणे अंमलदाराने उडवाउडवीची उत्तरे देऊन फोन कट केला. या प्रकरणी दुकानदारांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. या कॅमेऱ्यांपैकी पोलीस ठाणे हद्दीतील कॅमेरा सोडून इतर चार कॅमेरे हे सहा महिन्यांपासून बंद आहेत.
कामशेत शहरात शिवजयंती, होळी, रंगपंचमी आदी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटील, सार्वजनिक मंडळे, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक आदींची बैठक घेण्यात आली होती. या वेळी साईबाबा चौक वस्तीत चोर येत असल्याची काही जणांनी तक्रार करूनही काहीही कारवाई काही झाली नाही. शहरात वाढणाºया भुरट्या चोºया व दरोडे यांच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांपूर्वी शहरात बाजारपेठेतील व्यापारी व इतरांच्या आर्थिक मदतीने पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. त्यांपैकी पोलीस ठाणे हद्दीतील कॅमेरा सोडून इतर चार कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १४) रात्री दोन ते तीनच्या सुमारास शहरातील पारस परमार, आनंद हिंगडे, विकास ननावरे, सहदेव केदारी, कांतीलाल भाटी, रामलाल प्रजापती यांच्या दुकानांचे शटर कटावणीच्या साहायाने उचकटून दुकानातील चिल्लर व किरकोळ सामानाची चोरी झाली, तर कमल मेन्सवेअर या दुकानाचे शटर तोडण्याचा प्रयत्न झाला. सर्व दुकानांतील चिल्लर चोरीला गेली असून दुकानाच्या शटरचे मोठे नुकसान झाल्याने व्यापारी वैतागले आहेत.
रात्री चोरी होत आहे या संबंधी पोलीस ठाण्यात फोन करून संपर्क केला असता संबंधित पोलीस कर्मचारी यांच्याकडून बेजबाबदारपणे उत्तरे देण्यात आली. येथील सीसीटीव्ही कॅमेरे सहा महिन्यांपासून बंद आहेत. याला जबाबदार कोण आदी प्रश्न व्यापाºयांनी उपस्थित केले आहेत. त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात या संबंधीचे निवेदन व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विलास भटेवरा, करण ओसवाल, रमेश लुणावत, पारस परमार व इतर अनेक व्यापाºयांनी पोलीस ठाण्यात दिले.