ब्रम्ह शिखर परिषदेच्या अध्यक्षपदी निखिल लातूरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:19 AM2021-09-02T04:19:48+5:302021-09-02T04:19:48+5:30
पुणे : ब्रम्ह महाशिखर परिषदेच्या संस्थापक अध्यक्षपदी निखिल लातूरकर यांची, तर प्रदेशाध्यपदी सुरेश मुळे यांची निवड करण्यात आली आहे. ...
पुणे : ब्रम्ह महाशिखर परिषदेच्या संस्थापक अध्यक्षपदी निखिल लातूरकर यांची, तर प्रदेशाध्यपदी सुरेश मुळे यांची निवड करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजातील ३०० हून अधिक संघटना परिषदेला सहकार्य करत आहे.
ब्रम्ह महाशिखर परिषदेची २०२१-२०२२ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे. १५ ऑगस्ट रोजी या संदर्भात व्हर्च्युल मीटिंग घेण्यात आली. या नवीन कार्यकारिणीला करवीर पीठाचे शंकराचार्य व ज्योतिषतज्ज्ञ अतुलशास्त्री भगरे यांनी शुभेच्छा दिल्या.
ब्राह्मण समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची मागणी व पाठपुरावा करणे, ब्राह्मण समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे, ब्राह्मण समाजातील शेतकऱ्यांकडे असलेली वर्ग-२ व इतर इनाम जमीन या भोगवटादार क्र.१ मध्ये शासनाकडून समाविष्ट करून घेणे, ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह व इतर सुविधा जिल्हास्तरावर शासनाकडून उपलब्ध करून घेणे, ब्राह्मण समाजातील पुरोहित वर्ग ज्याचा उदरनिर्वाह पूर्णपणे पौरोहित्यावर सुरू अशांना शासनाकडून दरमहा ५ हजार रुपये मानधन मिळण्यासाठी पाठपुरावा करणे आदी विविध प्रश्न घेऊन परिषद काम करत आहे.
----
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे...
संस्थापक अध्यक्ष-निखिल लातूरकर
प्रदेशाध्यक्ष - सुरेश मुळे
कार्याध्यक्ष - मकरंद कुळकर्णी
प्रदेश उपाध्यक्ष - गजानन जोशी
प्रदेश कोषाध्यक्ष - सचिन वाडे-पाटील
प्रदेश सचिव - नीलेश कुळकर्णी
प्रदेश प्रवक्ता - काकासाहेब कुळकर्णी
प्रदेश महिला संघटक - ईश्वरी जोशी
प्रदेश युवा संघटक - विशाल शिखरे