बसेसमध्ये सीसीटिव्ही बसविण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी अामदार निधीतून दिले 10 लाख रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 07:53 PM2018-06-26T19:53:48+5:302018-06-26T19:56:05+5:30
पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला
पुणे : पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला. तसेच सीसीटिव्ही ज्या मार्गावर महिला उशिरापर्यंत प्रवास करतात अशा मार्गावर लावण्याच्या सूचना दिल्या.
पीएमपीमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षित राहाव्यात, सक्षम व्हाव्यात यासाठी मंगळवारी पीएमपीने सुसंंवाद दिनाचे अायाेजन केले हाेते त्यावेळे त्यांनी ही घाेषणा केली. यावेळी बाेलताना गोऱ्हे म्हणाल्या काळानुरूप महिलांमध्ये धाडस आणि समज वाढत चालली आहे, महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे महिलांचं अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे ते स्वागतार्ह असल्याचे सांगून या समितीमधील कामाची व्यवस्था कशी चालते हे सर्वसामान्यांनाही माहित व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पीएमपीएल मधील महिलांना व पुरूषानांही पुरस्कार द्यावेत त्यामुळे त्यांच्यामध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल, तसेच यावेळी त्यांनी स्त्री आधार केंद्रामुळे २०० अल्पवयीन मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या, आत्तापर्यंत ५ हजार कुटुंबांना स्त्री आधार केंद्राने आधार दिला. असे सांगत तुमच्यावरही कधीही कुठलाही प्रसंग ओढावल्यास स्त्री आधार केंद्राला कधीही हाक मारा तुमच्या पाठीशी सदैव हजर राहील असे अाश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी कार्यक्रमाला महापाैर मुक्ता टिळक, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे उपस्थित हाेत्या.