नीलेश गटणे यांची भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:08 AM2021-07-19T04:08:15+5:302021-07-19T04:08:15+5:30

नीलेश गटणे यांची केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक व युनियन बँकेत अधिकारी म्हणून निवड झालेले व १९९६ मध्ये लोकसेवा ...

Nilesh Gatne promoted to Indian Administrative Service | नीलेश गटणे यांची भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती

नीलेश गटणे यांची भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती

googlenewsNext

नीलेश गटणे यांची केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक व युनियन बँकेत अधिकारी म्हणून निवड झालेले व १९९६ मध्ये लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून उपजिल्हाधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत दाखल झाले. कोकण विभागात प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे, उपविभागीय अधिकारी माणगाव-रोहा यासह व्यवस्थापकीय संचालक, चित्रनगरी, गोरेगाव, मुंबई, उपायुक्त, कल्याण-डोंबिवली मनपा, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी व प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, पुणे या पदांवर यशस्वी कामकाज केलेले आहे. चाकण एमआयडीसीमधील क्लिष्ट जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचे व औद्योगिक वसाहत विकसित करण्यामागे त्यांचे कष्ट आजही स्थानिक विसरत नाहीत.

अप्पर जिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाल्यानंतर नागपूर विभागात व त्यानंतर सन २०१४ च्या निवडणुकांसमयी सह मुख्य निवडणूक अधिकारी म्हणूनही काम पाहिले. महावितरण मध्ये कार्यकारी संचालक तसेच महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे भूसंपादन या प्रक्रियेनंतर सध्या ते कोकण विभागात सेवेत आहे. जिल्हा जात पडताळणी समितीवर कार्यरत आहे.

१८ दौंड गटणे

Web Title: Nilesh Gatne promoted to Indian Administrative Service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.