निळू फुले यांचे कार्य प्रेरणादायी : कुंभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:27+5:302021-07-18T04:09:27+5:30
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने दहावा निळू फुले स्मृती कला गौरव पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या ...
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने दहावा निळू फुले स्मृती कला गौरव पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी डॉ. राजेंद्र कुंभार (साहित्यिक), डॉ. कुंडलिक केदारी (चित्रपट निर्माता दिग्दर्शक), समाजसेविका रुक्मिणी नागापुरे यांना सन्मानचिन्ह व शाहू महाराज यांचे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विश्वकर्मा आरोग्य रत्न पुरस्कार सुनील कांबळे, चंद्रकांत पवळे यांना देण्यात आला. या पुरस्काराचे वितरण माजी रणजी क्रिकेट पटू श्याम ओक, पत्रकार श्याम दौंडकर, डॉ. प्रसाद खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी विचार पीठावर ओबीसी जनमोर्चाचे दिगंबर लोहार, प्रमोद सूर्यवंशी, अनिल सोमवंशी, महेश सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत गवळी होते. प्रास्ताविक विष्णू गरुड यांनी केले. सूत्रसंचालन संजय भालेराव, तर कार्यक्रमाचे संयोजन अनिल सोमवंशी, प्रमोद सूर्यवंशी यांनी केले.