निमगाव केतकीत चाकूचे वार करुन विवाहितेचा निर्घृण खून, आरोपीस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 10:06 IST2024-12-05T10:05:00+5:302024-12-05T10:06:20+5:30
इंदापूर : एका विवाहित महिलेचा चाकूचे वार करुन निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना निमगाव केतकी येथे बुधवारी ( ता. ...

निमगाव केतकीत चाकूचे वार करुन विवाहितेचा निर्घृण खून, आरोपीस अटक
इंदापूर : एका विवाहित महिलेचा चाकूचे वार करुन निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना निमगाव केतकी येथे बुधवारी ( ता. ४) रात्री घडली आहे. संशयित आरोपीस पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
सुनिता दादाराव शेंडे (वय ३३ वर्षे रा.शेंडेवस्ती ता. इंदापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. ज्ञानेश्वर बबन रासकर (रा.सुरवड, ता.इंदापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. मयत विवाहितेचा पती दादाराव निवृत्ती शेंडे (वय ३७ वर्षे, रा.शेंडेवस्ती, निमगाव केतकी, ता.इंदापूर) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले की, 'बुधवारी रात्री सव्वाआठ ते साडेआठच्या सुमारास निमगाव केतकी गावच्या हद्दीत सराफवाडी रस्त्याच्या डाव्या बाजुला असणाऱ्या अजिनाथ मोरे यांच्या पत्र्याच्या शेडखाली अज्ञात कारणामुळे आरोपी रासकर याने त्याच्याकडील चाकूने आपली पत्नी सुनीता शेंडे हिच्या सपासप वार करत जीवे मारले. या प्रकरणी दादासाहेब शेंडे यांनी फिर्याद दिली. त्या फिर्यादीच्या अनुषंगाने तातडीने तपास करत पोलीसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे अधिक तपास करत आहे.