निमगावकरांनी बेलभंडारा नितीन गडकरींना पाठवला कुरियरने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:09 AM2021-04-26T04:09:24+5:302021-04-26T04:09:24+5:30
निमगाव खंडोबा व परिसरात विकास कामांसाठी ५६ कोटी रुपये निधी दिल्याची घोषणा गडकरी यांनी केली. निमगावचे सुपुत्र संकेत भोंडवे ...
निमगाव खंडोबा व परिसरात विकास कामांसाठी ५६ कोटी रुपये निधी दिल्याची घोषणा गडकरी यांनी केली. निमगावचे सुपुत्र संकेत भोंडवे सध्या गडकरी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहे. त्यातून हे मोठे काम मंजूर झाले आहे.
खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड व रेस्ट हाऊस तसेच खंडोबा मंदिर पायथ्याशी रोपवे स्टेशनशेजारी भव्य बगीचा, स्वच्छतागृह, भक्त निवास, वृक्षारोपण त्याचप्रमाणे मंदिर परिसरामध्ये हायमॅक्स लाइट इत्यादी सुविधा करण्यात येणार आहेत.या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्रांच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. तसेच निमगाव, दावडी, कनेरसर या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे. खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची होणारी अडचण दूर होऊन भाविकांना सुखसुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आज दि. २३ रोजी खंडोबा देवस्थान ट्रस्टी, निमगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येत खंडेरायाची बेल भंडाराने ग्रामस्थांनी तळी भरुन खंडेरायाचा मानाचा प्रसाद म्हणून गडकरी साहेबंना बेलभंडारा कुरियने दिल्लीला रवाना करण्यात आला.
ग्रामपंचायत व देवस्थानच्या वतीने आभार पत्र पाठवण्यात आले. यावेळी युवा नेतृत्व विजयसिंह शिंदे पाटील, खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष बबनराव शिंदे, राज्य पोलिस पाटील संघटनेचे बाळासाहेब शिंदे, निमगावचे माजी सरपंच बबन शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
२५ दावडी
निमगाव खंडोबा या परिसराच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाल्याबद्दल खंडोबा मंदिरा समोर ग्रामस्थांनी देवाची तळी भरून आनंद व्यक्त केला.