निमोणे- करडे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:18+5:302021-03-22T04:11:18+5:30

हा साधारण ८ किमी लांबीचा शिरूर तालुक्याचा पूर्ण भाग आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. याशिवाय अष्टविनायकापैकी ...

Nimone- Gray road condition | निमोणे- करडे रस्त्याची दुरवस्था

निमोणे- करडे रस्त्याची दुरवस्था

Next

हा साधारण ८ किमी लांबीचा शिरूर तालुक्याचा पूर्ण भाग आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. याशिवाय अष्टविनायकापैकी रांजणगाव व सिद्धटेक या तीर्थस्थळांना जाण्यासाठी या मार्गाचाही मोठ्या प्रमाणावर वापर होते असतो. त्यामुळे कामगार, शेतकरी, भाविकांसह अनेकांच्या वाहतुकीचा हा मार्ग आहे. त्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. सध्या मात्र या रस्त्याची वाट लागली आहे. या मार्गाने तालुक्याच्या पूर्वभागातून सतत होणारी अवैध वाळूवाहतूक, वीट तसेच ऊस वाहतुकीमुळे रस्ता खराब झाला आहे. पडलेले खड्डे, तुटलेल्या कडा, खचलेल्या साईडपट्टया, दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे अशी सध्या रस्त्याची स्थिती आहे. काही महिन्यांपूर्वी संबंधित खात्याचे वतीने चांगली दुरुस्ती केली होती. मात्र अवजड वाहतुकीमुळे पुन्हा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या रस्त्याची संपूर्ण त्वरित दुरुस्ती करावी. केवळ तात्पुरती डागडूजी न करता संपूर्ण नूतनीकरणच करण्यात यावे, अशी प्रवाशींची मागणी आहे. एक दोन ठिकाणी खड्डे पडले आहेत.

लवकरच पाहणी करून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला जाईल.

शिरूर तालुका बाधकाम विभाग उपअभियंता सोनवणे

निमोणे - करडे रस्त्याची झालेली दुरवस्था

Web Title: Nimone- Gray road condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.