प्रकाश आण्णा गोंधळे खूनप्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेच्या ९ कार्यकर्त्यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:43 PM2023-01-12T14:43:37+5:302023-01-12T14:46:59+5:30
सत्र न्यायाधीश के.पी नांदेडकर यांनी हा निकाल दिला...
पुणे : हडपसर येथील प्रकाश आण्णा गोंधळे यांच्यावर कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणात हिंदू राष्ट्रसेनेच्या नऊ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायाधीश के.पी नांदेडकर यांनी हा निकाल दिला.
आरोपींना भा.दं.वि कलम 302 तसेच 506 (2) अंतर्गत दोन वर्षे, फौजदारी कायद्यातील कलम 7 च्या तरतुदीनुसार 6 महिने आणि प्रत्येकी आरोपीला 20 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला असून, दंडाव्यतिरिक्त आरोपींनी 1 लाख 50 हजार रुपयांची रक्कम गोंधळे यांच्या कुटुंबियांना द्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.हिंदू राष्ट्र सेनेचे कार्यकर्ते विकी जाधव, वैभव भाडळे, अक्षय इंगुळकर, श्रीकांत आटोळे ,अमोल शेगडे, राहुल कौले, विकी पाटील, सूरज फडके, आकाश शिंदे अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
ही घटना 2013 ची आहे. जूनमध्ये प्रकाश आण्णा गोंधळे यांच्या घरावर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात त्यांनी दरवाजावर पेट्रोल टाकून दरवाजा जाळण्यात आला होता. घरात जाऊन
घराचे नुकसान केले होते. या प्रकरणाची फिर्याद प्रकाश आण्णा गोंधळे हडपसर पोलीस स्टेशन मध्ये दिली होती. त्या नंतर सतत त्याचा पाठपुरावा घेऊनही आरोपींना अटक करण्यात आली नव्हती. 8 जुलै 2013 रोजी रात्री
पावणे अकराच्या सुमारास प्रकाश आण्णा हे नेहमी प्रमाने रेशनिंग दुकाना वरून त्यांचा घरी चाले होते. त्यांना आरोपींनी अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार करत जीव घेणा हल्ला केला व त्या हल्ल्ल्यामध्ये प्रकाश आण्णा ह्यांचा मृत्यू झाला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर या केसमधील फियार्दी, साक्षीदार, पंच यांना केसमध्ये लक्ष घालू नका अशा प्रकारच्या धमक्या येत होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा सर्व प्रकार सांगितला व त्यांनी लक्ष घालत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची या केस मध्ये नियुक्ती केली.
खटल्याचे कामकाज चालू असताना 18 जानेवारी2020 रोजी फिर्यादी राजेंद्र पिंगळे यांनी फियार्दी साक्ष देऊ नये म्हणून त्यांच्या मुलाला ऋषिकेश पिंगळे या वर सुद्धा जीव घेणा हल्ला करण्यात आला, केससाठी कोर्टात आलेल्या पंच साक्षीदारांवर सुद्धा आरोपी किंवा त्यांचे मित्र यांच्याकडून दबाव टाकण्यात येत होते. नांदेडकर कोर्टात केस मध्ये एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले.
प्रकाश आण्णा वर केलेला हल्ला हा अतिशय क्रूर आहे व फियार्दी वर सुद्धा हल्ला करण्यात आला आहे, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. तो ग्राहय धरीत म्हणून सत्र न्यायाधीश नांदेडकर यांनी सर्व आरोपींना
मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा ठोठावली.