नाट्य संमेलनासाठी नागपूर, महाबळेश्वर, उस्मानाबाद, कोल्हापूरसह नऊ निमंत्रणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:00 AM2018-09-09T06:00:56+5:302018-09-09T06:00:58+5:30
९९ व्या नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्यभरातून इच्छुक संस्था व शाखांकडून नऊ ठिकाणच्या शाखांची निमंत्रणे नाट्य परिषदेकडे आली आहेत.
पुणे : ९९ व्या नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्यभरातून इच्छुक संस्था व शाखांकडून नऊ ठिकाणच्या शाखांची निमंत्रणे नाट्य परिषदेकडे आली आहेत.
सरकारने नाट्य संमेलनासाठी ५० लाख रूपयांची तरतूद केल्यामुळे अनेक संस्था व शाखा आयोजनासाठी सरसावल्या असून नागपूर, महाबळेश्वर, चिपळूण, पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक आणि सोलापूर अशा ९ ठिकाणांहून नाट्य परिषदेकडे प्रस्ताव आले आहेत. ज्या शाखांमार्फत संमेलन आयोजित केले जाते. त्यांना परिषदेच्या शाखांकडे जीएसटी क्रमांक नसल्यास प्रायोजकांची रक्कम ही मध्यवर्ती शाखेकडे जमा होईल. त्या शाखांच्या नावाने चेक दिला जाईल, अशी माहिती पोंक्षे यांनी दिली.
>स्थळांच्या पाहणीसाठी समिती स्थापन
या स्थळांच्या पाहणीसाठी पाच सदस्यांची निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांकडून गणेशोत्सवानंतर या स्थळांची पाहणी केली जाईल, अशी माहिती समितीचे सदस्य सतीश लोटके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.