पुरंदरमध्ये म्युकरमायकोसिसचे नऊ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:59+5:302021-06-04T04:09:59+5:30

पुरंदर तालुक्यात आतापर्यंत मयुकरमायकोसिसचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर चार रुग्ण ...

Nine patients with myocardial infarction in Purandar | पुरंदरमध्ये म्युकरमायकोसिसचे नऊ रुग्ण

पुरंदरमध्ये म्युकरमायकोसिसचे नऊ रुग्ण

Next

पुरंदर तालुक्यात आतापर्यंत मयुकरमायकोसिसचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर चार रुग्ण सध्या या आजारावर उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत दोन रुग्ण या आजारातून मुक्त झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दिली आहे.

पुरंदर तालुक्यातील दि. १५ एप्रिलनंतर कोरोनाबाधित झालेल्या २,०६१ रुग्णाचा सर्वे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. यामध्ये १६ रुग्ण संशयित आढळले होते. या पैकी नऊ रुग्णांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याचे निदान झाले होते. यातील सासवडमधील दोन लोकांचा, तर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दोन रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. चार रुग्ण पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यात सुध्दा म्युकरमायकोसिसचा चांगलाच शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

म्युकरमायकोसिस आजाराबाबत लोकांनी काळजी घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव यांनी केले आहे. हा आजार कोरोना रुग्णांनाच होतो याबाबत खात्री देता येत नाही. हा आजार यापूर्वीसुद्धा होता. पुरंदरमध्ये आढळलेले रुग्ण पूर्वी कोरोनामुक्त झालेच आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी आपल्या डोळ्याच्या, नखाच्या व दातांच्या संदर्भात काही समस्या असतील तर प्राथमिक अवस्थेत असतानाच तपासणी करून घ्यावे असा त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Nine patients with myocardial infarction in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.