बालेवाडी परिसरात एकापाठोपाठ नऊपेक्षा जास्त सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 12:19 AM2020-04-11T00:19:04+5:302020-04-11T00:24:15+5:30
अवैध रीतीने सिलेंडर सिलेंडरचा साठा करून सिलेंडर भरून विकणाऱ्या दुकानांमध्ये अचानक स्फोट
पाषाण : बालेवाडी दसरा चौकामध्ये अवैध रीतीने सिलेंडर सिलेंडरचा साठा करून सिलेंडर भरून विकणाऱ्या दुकानांमध्ये अचानक स्फोट झाल्याने या ठिकाणी भरलेले सुमारे नऊहून अधिक सिलेंडर एकापाठोपाठ फुटले. या दुकानात काम करणारा एक कामगार जखमी झाला असून तो त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.या दुकानाला शेजारी असलेल्या तीन ते चार दुकानांचे स्फोटांमुळे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगीच्या ज्वाला पसरला होत्या स्फोटाच्या आवाजामुळे या परिसरात मध्ये घबराट निर्माण झाली होती. एकामागून एक स्फोट होत असल्याने या परिसरात मध्ये बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच गर्दी हटवण्यासाठी पोलीस देखील बोलवण्यात आले होते. या आगीमुळेबालेवाडी परिसरातील डी.पी. जळाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. या दुकानात मधून आग विझवल्यानंतर 16 भरलेले सिलेंडर व 23लहान सिलेंडर देखील अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत विक्री स्टॉल व पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. भाजी ,किराणामाल, टायर तसेच चिकन व फळांची दुकाने या ठिकाणी होती.
बघ्यांची गर्दी सुमारे पंचवीस-तीस हून अधिक पोलिसांनी कारवाई करत गर्दी आटोक्यात आणली. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित आग विझवत भरलेले सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.