आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नऊ मजली वसतिगृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:16 AM2021-02-18T04:16:49+5:302021-02-18T04:16:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना निवासाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यासंबंधी गेल्या अनेक ...

Nine storey hostel for tribal students | आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नऊ मजली वसतिगृह

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी नऊ मजली वसतिगृह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना निवासाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यासंबंधी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून वसतिगृहाची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी हडपसर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाने वसतिगृह इमारतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. शैक्षणिक सोयीसुविधांमुळे राज्यभरातील विविध विद्यार्थी पुण्यात प्रवेश घेत असतात. त्याचप्रमाणे राज्यातील आदिवासी जमातीतील अनेक विद्यार्थी पुण्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, राहण्याची सोय नसल्याने त्यांची अडचण होते.

चौकट

हडपसर भागातील महंमदवाडी येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी ४४ कोटी ८५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मंत्री पाडवी म्हणाले की, आदिवासी वसतिगृहाची इमारत नऊ मजली असणार आहे. यात इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. या वसतिगृहाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Web Title: Nine storey hostel for tribal students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.