तौक्तेच्या तडाख्याने २९ गावांतील नऊ हजार घरे अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:23+5:302021-05-19T04:10:23+5:30

भोर तालुक्यात काल आणि आज पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे भोर-महाड रस्त्यावरील अनेक ठिकाणी झाडांच्या फाद्यांची पडझड झाली आहे. ...

Nine thousand houses in 29 villages are in darkness due to the impact of Toukte | तौक्तेच्या तडाख्याने २९ गावांतील नऊ हजार घरे अंधारात

तौक्तेच्या तडाख्याने २९ गावांतील नऊ हजार घरे अंधारात

Next

भोर तालुक्यात काल आणि आज पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे भोर-महाड रस्त्यावरील अनेक ठिकाणी झाडांच्या फाद्यांची पडझड झाली आहे. राजा रघुनाथराव विद्यालयातील जुने अनेक वर्षांपासून असलेले आंब्याचे झाड पडले. अनेक भागात वादळी वाऱ्याने झाडांची पडझड होऊन मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणीची झाडे बाजूला करण्यात आली आहेत.

दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने वीज वितरण कंपनीचे पिसावरे, नांदगाव, वरचे नांद, धावडी, बाजारवाडी, मानकरवाडी टिटेघर, कारी, केंजळ, साळवा, पऱ्हर, धानवली, गुढे, निवंगण शिरवली, माझेरी, कुडली, पान्हवाळ, वरोडी, करंजे, वाकांबे, निगडे, सावरदरे, धांगवडी, मळे, तळे म्हसीवली, कुरुंजी, सुतारवाडी

येथील उच्चदाब वाहिनीचे व लघुदाब वाहिनीचे ८२ खांब पडले. तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे सुमारे २९ गावांतील ९३५५ ग्राहक अंधारात आहेत.

--

वादळी वाऱ्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले. त्याप्रमाणे वीज वितरण कंपनीचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळात पडलेल्या वाकलेल्या विजेच्या खांबांची व तारांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून काही वेळातच वीजपुरवठा सुरळीत करण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

- संतोष चव्हाण, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी

--

फोटो क्रमांक : १८ भोर तारा तुटल्या

फोटो ओळी : पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे भोर तालुक्यातील पडलेली विजेचे खांब आणि तुटलेल्या विजेच्या तारा.

Web Title: Nine thousand houses in 29 villages are in darkness due to the impact of Toukte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.