अकरावीच्या सव्वा लाख जागा रिक्त, प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 05:47 AM2017-09-18T05:47:02+5:302017-09-18T05:47:04+5:30
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पुणे : राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या सहा शहरांमध्ये अकरावीच्या सुमारे सव्वालाख जागा अद्याप रिक्त आहेत. प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांची मंगळवारपासून अखेरची फेरी घेऊन प्रवेश प्रक्रिया बंद केली जाणार आहे. मात्र त्यानंतरही रिक्त जागा फारशा कमी होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
राज्यात सहा प्रमुख शहरांमध्ये एकाच वेळापत्रकानुसार अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षण विभागाने पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद असे सहा स्वतंत्र विभाग केले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक २ लाख ९७ हजार ३१५ एवढी प्रवेश क्षमता आहे. या सहा विभागांमध्ये एकूण प्रवेशक्षमता ५ लाख ९ हजार ६१० आहे. त्यासाठी ३ लाख ९३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. सर्वच ठिकाणी उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्जांची संख्या कमी आहे.
प्रवेशाच्या एकूण सात फेºया झाल्या. एकूण अर्जांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. केंद्रीय प्रवेशामधून सुमारे ३ लाख ४ हजार, तर कोट्यातून सुमारे ८० हजार
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे अद्याप १ लाख २४ हजार
जागा रिक्त आहेत. त्यापैकी ६६ हजार जागा मुंबईतील आहेत. आठव्या फेरीमध्ये जास्त प्रवेश होण्याची शक्यता नाही. त्यामुळे रिक्त जागांचा आकडा फारसा कमी होण्याची शक्यता नाही.
सध्या सुरू असलेल्या आठव्या ‘प्रथम येणाºयास, प्रथम प्राधान्य’ या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन प्रवेश निश्चित करता येणार आहे. ही अखेरची संधी असेल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली.