नव्वद टक्के मतदान
By admin | Published: November 24, 2014 12:44 AM2014-11-24T00:44:52+5:302014-11-24T00:44:52+5:30
डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले.
पुणे : डिसेंबर महिन्यात मुदत संपणाऱ्या तसेच विभाजनामुळे व नव्याने अस्तित्वात आलेल्या जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान झाले. सरासरी ८९ टक्के मतदान झाले असून, कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हवेली तालुक्यातील आगळंबे, कल्याण, खेडमधील टेकवळी, दौंडमधील राहू, टेळेवाडी, मुळशीतील निवे, आंबेगावातील विठ्ठलवाडी, पुरंदरमधील नावळी, धनकवडी, दवणेवाडी या ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरमध्ये संपत आहे.
या अकरांपैकी खेडमधील टेकवळी, आंबेगावमधील
विठ्ठलवाडी आणि दौंडमधील पिलणवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे उर्वरित आठ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली.
या निवडणुकीसाठी ईव्हीएम मशिनचा वापर पहिल्यांदाच करण्यात आला. मतदारसिंाठी नोटाचा पर्याय होता. सकाळपासून मतदानासाठी रांगा होत्या.
या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक पुण्यात दाखल झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक आज (सोमवारी) जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.