नीरा भीमा कारखाना सात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:14 AM2021-09-04T04:14:28+5:302021-09-04T04:14:28+5:30

हर्षवर्धन पाटील : कारखानास्थळावर नवीन ट्रॅक्टर टायरगाड्यांचे पूजन लाखेवाडी: शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची ...

Nira Bhima Factory Seven | नीरा भीमा कारखाना सात

नीरा भीमा कारखाना सात

Next

हर्षवर्धन पाटील : कारखानास्थळावर नवीन ट्रॅक्टर टायरगाड्यांचे पूजन

लाखेवाडी: शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याची ऊसतोडणी व वाहतुकीची यंत्रणा गळीत हंगामासाठी सज्ज झाली आहे. आगामी गळीत हंगामामध्ये कारखाना ७ लाख मे. टन उसाचे गाळप करणार आहे, अशी माहिती संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ट्रॅक्टर टायर गाड्यांचे पूजन कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २) करण्यात आले. या वेळी पाटील बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले, कारखाना आगामी सन २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठी सज्ज झाला आहे. कारखान्याची ऊसतोडणी व वाहतुकीची यंत्रणा गळीत हंगामासाठी सज्ज झालेली आहे. कारखान्याने चालू वर्षी नवीन ६० ट्रॅक्टर टायर गाड्या (बजाट) बनविण्याचा निर्णय घेतला आहे., यामधील १० बजाट गाड्या आज कारखाना कार्यस्थळावर दाखल झाल्या आहेत. चालू होणाºया हंगामासाठी कारखान्याकडे एकूण २७० ट्रॅक्टर टायर गाड्यां (बजाट) चे ऊस वाहतुकीचे करार आहेत. तसेच ट्रॅक्टर व बैलगाड्यांची यंत्रणाही सज्ज असून कारखान्यांमधील मशिनरीची दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.

दरम्यान, गाड्या पूजनानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याची पाहणी करून अधिकारी वर्गाला सूचना दिल्या. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, कार्यकरी संचालक डी. एन. मरकड, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

फोटोओळी

नीरा भीमा कारखान्याच्या ट्रॅक्टर टायर गाड्यांचे पूजनप्रसंगी हर्षवर्धन पाटील आणि अन्य.

०३०९२०२१ बारामती—०२

Web Title: Nira Bhima Factory Seven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.