निरा देवघर धरण १०० टक्के भरले; वीजनिर्मितीसाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:34 PM2023-08-21T12:34:56+5:302023-08-21T12:37:23+5:30

निरा देवघर धरण भागात आज २० मिलीमीटर तर एकूण १५८७ मिलीमीटर पाऊस झाला आहे....

Nira Deoghar Dam 100 percent full; Release of 750 cusecs of water for power generation | निरा देवघर धरण १०० टक्के भरले; वीजनिर्मितीसाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

निरा देवघर धरण १०० टक्के भरले; वीजनिर्मितीसाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

googlenewsNext

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागात असलेले निरा देवघर धरण १०० टक्के भरले असून, धरणातून वीजनिर्मितीसाठी ७५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग निरा नदीत सोडला असल्याचे पाटबंधारे विभागाचे उपविभागीय सहायक अभियंता यो. स. भंडलकर यांनी सांगितले.

निरा देवघर धरण भागात आज २० मिलीमीटर तर एकूण १५८७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. भाटघर ८८.६ टक्के, गुंजवणी-८१.७६ टक्के, वीर ७६.११ टक्के पाणीसाठा असून, अद्याप तीनही धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. पावसाअभावी मागील वर्षीच्या तुलनेत निरादेवघर धरण उशिराने भरले आहे. सध्या धरण १०० टक्के भरले आहे. मात्र पावसाचा जोर कमी असल्यामुळे धरणातून पाणी बाहेर पडलेले नाही. पाऊस वाढला आणि धरणाची पाणीपातळीत वाढली तरच धरणातून पाणी बाहेर पडणारे आहे.

धरणाची पाणी साठवण क्षमता ११.९२ टीएमसी

धरण भरल्यामुळे आणि भाटघर धरण ८८ टक्के झाले असून, लवकरच धरण भरेल. यामुळे बारामती, फलटण, इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा शेतीची आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Web Title: Nira Deoghar Dam 100 percent full; Release of 750 cusecs of water for power generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.