मास्कच्या वापरासाठी नीरा पोलिसांचा बाजारात खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:50+5:302021-03-19T04:09:50+5:30

नीरा शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत. नीरा बाजारात मोठ्या ...

Nira police in the market for the use of masks | मास्कच्या वापरासाठी नीरा पोलिसांचा बाजारात खडा पहारा

मास्कच्या वापरासाठी नीरा पोलिसांचा बाजारात खडा पहारा

Next

नीरा शहरात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत. नीरा बाजारात मोठ्या प्रमाणात ग्राहक व व्यापाऱ्यांची गर्दी होत असते. त्यामुळे आज पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार यांच्या नेतृत्वात एक पथक बाजारात दिवसभर ठाण मांडून होते. संध्याकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण मांडून असल्याने बाजर मोडेपर्यंत बाजारकरू, व्यापारी व शेतकऱ्यांनी आज दिवसभर तोंडावरील मास्क खाली घेतला नाही.

यावेळी बाजारात पोलिसांनी दहा जणांवर विनामास्कबाबत कारवाई केली तर बाजार बाहेर दहा असे वीस लोकांवर कारवाई करून १० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर १७ वाहनचालकांवर ऑनलाईन केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपगार यांनी दिली. या कारवाई मध्ये सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड, सुदर्शन होळकर, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश कऱ्हे, नीलेश जाधव, होमगार्ड किरण शिंदे, प्रसाद तारू यांनी सहभाग घेतला नीराचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी पोलिसांना मदत करून कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Nira police in the market for the use of masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.