अंधांना दृष्टी देणाऱ्या निरंजन पंड्यांचे निधन
By admin | Published: March 5, 2017 04:45 AM2017-03-05T04:45:50+5:302017-03-05T04:45:50+5:30
बालपणी अपघाती अंधत्व आल्यानंतर अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे, पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष, महम्मदवाडीमध्ये
पुणे : बालपणी अपघाती अंधत्व आल्यानंतर अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आयुष्यभर धडपडणारे, पूना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे अध्यक्ष, महम्मदवाडीमध्ये एच. व्ही. देसाई नेत्ररुग्णालय उभारणारे निरंजन पंड्या (वय ७२) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यामागे दोन मुली आहेत. त्यांच्या पार्थिवावर धोबीघाटाजवळील स्मशानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या वर्षी पंड्या यांना कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हापासून ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. पंड्या यांचा जन्म ४ आॅगस्ट १९४५ मध्ये झाला. बालपणी
क्रिकेट खेळताना चेंडूमुळे अपघात होऊन त्यात त्यांची दृष्टी गेली. त्यांनी न डगमगता बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. जर्मनीमध्ये त्यांनी स्वयंसेवी संस्थांचे व्यवस्थापन विषयात उच्च शिक्षण घेतले. १९६६ मध्ये ते पूना ब्लाइंड मेन्स या संघटनेत मानद सचिव पदी दाखल झाले, त्यानंतर गेली ४८ वर्षे ते या संस्थेच्या कामात व्यग्र झाले.