वाल्ह्यात वाल्मीकींच्या पादुकांचे नीरास्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:10 AM2021-07-21T04:10:05+5:302021-07-21T04:10:05+5:30

वाल्मीकी जेथे तप केले ! ते वन पुण्यपावन जाले ! शुष्क काळी अंकुर फुटले !! पूर्वी होता वाल्या ...

Nirasnan of Valmiki's feet in Valha | वाल्ह्यात वाल्मीकींच्या पादुकांचे नीरास्नान

वाल्ह्यात वाल्मीकींच्या पादुकांचे नीरास्नान

Next

वाल्मीकी जेथे तप केले ! ते वन पुण्यपावन जाले ! शुष्क काळी अंकुर फुटले !!

पूर्वी होता वाल्या कोळी ! जीव घातकी भूमंडळी ! तोचि वनंदीजे सकळी ! विशुधी आणि ऋषेश्वरी !!

अवघ्या महाराष्ट्राला भक्तीमय करणारी आषाढी वारी गेली दोन वर्षे झाले कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होत नाही. प्रमुख मानाच्या पालख्यांना एसटीने पंढरपूरला जाण्यास संधी मिळाली. मात्र अनेक शेकडो पालख्या पंढरपूरला येत असतात. गेली दोन वर्ष झाले इतर पालखी व दिंडी हे आपाअपल्या पध्दतीने गावातच कार्यक्रम घेत आहेत.

कोरोना महामारीचे संकट सलग दुसऱ्याही वर्षी सर्वत्र असल्याने, सर्व पालखी सोहळे पायी जाण्याचा निर्णय शासनाने दुसऱ्याही वर्षी रद्द केला आहे. आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषींचे संजीवनी समाधी मंदिर असलेल्या श्री क्षेत्र वाल्हे (ता. पुरंदर) येथून महर्षी वाल्मीकीचा पंढरपूरकडे जाणारा पायी पालखी सोहळाही रद्द करण्यात आला होता. मात्र याही वर्षी वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी वाल्मीक ऋषीच्या पादुकांना आषाढी एकादशीनिमित्त, दुचाकीवरुन नीरा नदीवरील दत्तघाटावरती घेऊन जात, ह.भ.प. माणिक महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्मीकींच्या पादुकांसहित वीणा; टाळ; तुळस, भगवी पताका हातात घेऊन पवित्र नीरा नदीस्नान घालण्यात आले.

पवित्र नीरास्नान घालून वाल्हे गावाला दुचाकीवरुनच ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली व पादुकांना वाल्मिकी मंदीरामध्ये पालखीत ठेवत शासन नियमांचे पालन करीत पादुकांची विधिवत पूजा करून, भजन व आरती करण्यात आली.

यावेळी महर्षी वाल्मिकींच्या संजीवनी समाधी मंदिरामध्ये सोहळा व्यवस्थापक ज्ञानेश्वर भुजबळ, मंदिराचे पुजारी हभप बबन भुजबळ, विलास भुजबळ, छाया जगताप, वसंत नलवडे, किसन जगताप, काळे महाराज, तुकाराम भुजबळ, ज्ञानेश्वर कुदळे, मचिंद्र भुजबळ, सुरेश राऊत, महावीर भुजबळ आदी वैष्णव वाल्मीकी मंदिरामध्ये उपस्थित होते. --

फोटो क्रमांक : २० वाल्हे

फोटो ओळ. महर्षी वाल्मीकींच्या पादुकांना मोटरसायकलवरून पवित्र नीरा नदीस्नान करून आणतेवेळी हभप माणिक महाराज पवार, हभप बबन महाराज भुजबळ व विलास भुजबळ.

200721\20pun_2_20072021_6.jpg

फोटो क्रमांक : २० वाल्हे  फोटो ओळ. महर्षी वाल्मिकी च्या पादुकांना मोटर सायकल वरुन पवित्र नीरा नदी स्नान करुन आणते वेळी हभप माणिक महाराज पवार,हभप बबन महाराज भुजबळ व विलास भुजबळ.

Web Title: Nirasnan of Valmiki's feet in Valha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.