निरेत प्रहारचे थाळी नाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:12 AM2021-05-21T04:12:19+5:302021-05-21T04:12:19+5:30
नीरा : कडधान्यांच्या आयातीचे धोरण आणि रासायनिक खतांची दरवाढ या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ...
नीरा : कडधान्यांच्या आयातीचे धोरण आणि रासायनिक खतांची दरवाढ या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर थाळीनाद आंदोलन सुरू झाले असून, त्याचाच भाग म्हणून नीरा (ता. पुरंदर) येथील दिव्यांग बांधवांनीही आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये थाळ्या वाजवून केंद्र शासनाचा निषेध केला.
प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या तूर, मग, उडीद, या कडधान्यांची कारण नसताना आयात करणे, आयातीचे निर्बंध खुले करणे रासायनिक खतांचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे. वाढलेले पेट्रोलचे भाव कमी करावे या मागण्यांसाठी आणि केंद्र सराकराच्या या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ थाळी बजाव आंदोलन करण्यात आले. या वेळी मंगेश ढमाळ, अनिल मेमाणे, पप्पू धर्माधीकारी, आसिफ शेख यांसह दिव्यांग बांधव व महिला उपस्थित होत्या.
आंदोलनावेळी सामाजिक अंतर राखण्यात आले, मास्क लावण्यात आले व कोरोनाचे नियम पाळत हे आंदोनलन शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता फक्त दहा मिनिटे करण्यात आले. पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, पोलीस काँस्टेबल संदीप मोकाशी, नीलेश जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
--
फोटो क्रमांक : २०नीरा आंदोलन
फोटोओळ : नीरा (ता. पुरंदर) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिव्यांगांनी थळा वाजून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला.