निरगुडसर चार एप्रिलपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:09 AM2021-03-30T04:09:18+5:302021-03-30T04:09:18+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांनी ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामविकास अधिकारी प्रवीण खराडे यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निरगुडसर गाव पुढील चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे. गाव सोमवार दिनांक २९ मार्च ते १ एप्रिल पर्यत बंद राहणार आहे.
या मध्ये अत्यावश्यक सेवा मेडिकल, बँक, पतसंस्था, दूध संस्था, वगळण्यात आले असून इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सरपंच उर्मिला वळसे पाटील, यांनी केले आहे. तसेच कामानिमित्त बाहेरून गावांमध्ये येणाऱ्या नागरिकांनी व गावातील सर्व नागरिकांनी मास्कचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, गावात गर्दी जमवू नये असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य आनंदराव वळसे पाटील, जयश्री थोरात यांनी केले आहे.
--
२९ निरगुडसर गावा बंद
निरगुडसर ता.आंबेगाव येथे संशयित रूग्णांची तपासणी करताना आरोग्य कर्मचारी.तर कोरोना साखळी तोडण्यासाठी चार दिवस गाव बंद ठेवण्यात आले आहे.