बारामतीत दहशत माजविणाऱ्या नितीन तांबे टोळीला ‘ मोक्का’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:09+5:302021-04-21T04:10:09+5:30

शिरगांवकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी रात्री ०८:३० वा.ते ...

Nitin Tambe gang terrorized in Baramati | बारामतीत दहशत माजविणाऱ्या नितीन तांबे टोळीला ‘ मोक्का’

बारामतीत दहशत माजविणाऱ्या नितीन तांबे टोळीला ‘ मोक्का’

Next

शिरगांवकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत ७ फेब्रुवारी रोजी रात्री ०८:३० वा.ते ०९:४५ वा. दरम्यान यातील फिर्यादी त्यांचे स्नेहा गार्डन (फलटणरोड बारामती ता. बारामती जि. पुणे )हॉटेलवर होते.यावेळी हॉटेलमध्ये आरोपी नितीन बाळासो तांबे (रा.पाहणेवाडी ता.बारामती जि.पुणे )तसेच आरोपी अमिन दिलावर इनामदार (वय २७, रा. कसबा, बारामती) व अनोळखी तीन साथीदार आले.त्यांनी हॉटेलचालकास ‘मी एनटी भाई आहे. तु मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबध आहेत. तुला हॉटेल नीट चालवायचे असेल तर दर महिन्याला माझा माणूस येईल. त्याचेकडे २५ हजार रुपये दर महिन्याला द्यायचे ,नाहीतर मी स्वत: एनटी भाई येईन लक्षात ठेव. तू जर आमच्यावर गुन्हा दाखल केला तर आम्ही जेलमध्ये बसू व जेलमधून तुझा गेम करू असे म्हणून दमदाटी केली.

तसेच हॉटेलचालकास फिर्यादीस हाताने फाईट मारली. खिशातून चाकू काढत हप्ता नाही दिला तर हॉटेल बाहेर आल्यावर तुझे तुकडे पाडू अशी धमकी दिली.तसेच, धक्काबुक्की करून आरोपींनी हॉटेलच्या काउंटरमधील ७,२००/- रुपये रोख रक्कम, हॉटेलचे लायसन्स एफ.एल.३-१६११, न्यु लिफ कंपनीचे घड्याळ असे जबरीने दरोडा टाकल्याची घटना घडली होती.

यातील आरोपी तांबे, इनामदार या दोघांसह गणेश संजय बोडरे (सर्व रा. बारामती ता. बारामती जि. पुणे ) व अनोळखी २ इसम यांचेवर बारामती शहर व परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, खंडणी मागणी अशा स्वरूपाचे १३ गुन्हे संघटिपणे केल्याचे निष्पन्न झालेले आहेत. आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई होण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आरोपींनी गुन्हयाचे स्वरूप पाहता त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईकामी प्रस्ताव मंजुर करण्यात आला आहे.

दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास शिरगांवकर करीत आहेत.पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगांवकर, ब पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पालवे, पोलीस अंमलदार अविनाश दराडे, अतुल जाधव, अंकुश दळवी यांनी ही कारवाई केली.कारवाईबाबत पोलीस अधिक्षक डॉ.देशमुख यांनी १५ हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

————————————————

फोटोओळी—नितीन तांबे ,गणेश बोडरे ,अमीन इनामदार या आरोपींचे फोटो.

२००४२०२१ बारामती—०६

————————————

Web Title: Nitin Tambe gang terrorized in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.