महापालिकेच्या उत्पन्नाला मंदीची झळ

By admin | Published: March 31, 2017 03:03 AM2017-03-31T03:03:32+5:302017-03-31T03:03:32+5:30

महापालिकेच्या उत्पन्नामध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी), मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी यांचा समावेश

NMC's earnings slump | महापालिकेच्या उत्पन्नाला मंदीची झळ

महापालिकेच्या उत्पन्नाला मंदीची झळ

Next

पुणे : महापालिकेच्या उत्पन्नामध्ये स्थानिक संस्था कर (एलबीटी), मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क, पाणीपट्टी यांचा समावेश आहे. मात्र सध्या मंदीची परिस्थिती असल्याने या उत्पन्नाला मोठा फटका बसल्याचे चित्र दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये (२०१६-१७) तब्बल १७०० कोटी रुपयांची तूट आली आहे.
त्यामुळे उत्पन्नाचे पर्यायी मार्ग वाढविण्यावर भर देणे आवश्यक होते, मात्र प्रशासनाकडून त्याबाबत फारसे प्रयत्न झालेले दिसून येत नाहीत.
महापालिकेने २०१६-१७ या वर्षासाठी ५ हजार ७४८ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र डिसेंबर २०१६ पर्यंत केवळ २ हजार ६१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाच्या उत्पन्नात तब्बल ३१८ कोटी रुपयांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम विभागाला चालू वर्षी ४७० कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम परवानगी आणि प्रीमियमच्या माध्यमातून हे उत्पन्न मिळाले. मागील वर्षी बांधकाम विभागाला (२०१५-१६) मध्ये ७८८ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. या तुलनेत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. मिळकत कर विभागाला या वर्षी ११३१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी मिळकत कर विभागाला ११०६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
याबाबत कुणाल कुमार यांनी सांगितले, ‘‘महापालिकेला मिळकत करातून चांगले उत्पन्न अपेक्षित आहे. शहरातील सर्व मिळकतींचा सर्व्हे केला जात आहे, त्यातून मिळकत कर लागू नसलेल्या अनेक मिळकती उजेडात येणार आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकेल. पाणीपट्टीच्या वाढीतून मिळालेली रक्कम स्वतंत्र खात्यामध्ये ठेवली जाणार आहे. ही रक्कम २४ तास पाणीपुरवठा या योजनेवरच खर्च केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रीमियम एफएसआयतूनही पालिकेला वाढीव उत्पन्न मिळू शकणार आहे.’’
पुढील वर्षात विकासकामांसाठी २ हजार ७१४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये भांडवली कामे, क्षेत्रीय कार्यालयाकडून करायची कामे, वॉर्डस्तरीय निधी यांचा समावेश आहे.

उत्पन्न गाठणे अवघड
आगामी २०१७-१८ या वर्षासाठी ५६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये स्थानिक संस्था करापोटी १७३० कोटी, मिळकत करापोटी १३३३, विकास शुल्क १०२५ कोटी, पाणीपट्टी ३१९ कोटी, शासकीय अनुदान ३२९ कोटी, इतर जमा ६०१ कोटी, कर्जातून २६१ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.
मात्र मंदीचे वातावरण असल्यामुळे या इतके उत्पन्न गाठणे अवघड जाणार आहे.

आकाशचिन्हाच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष
शहरात जाहिरातीसाठी परवानगी
देण्यातून मोठे उत्पन्न आकाशचिन्ह विभागाला मिळू शकेल.
मात्र, अंदाजपत्रक तयार करताना आकाशचिन्ह विभागाच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
त्याचबरोबर अग्निशमन दलाचे उत्पन्न वाढविण्यावरही भर देण्यात आलेला नाही.

Web Title: NMC's earnings slump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.