नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि मुकुंद अभ्यंकर यांना जाहीर

By नम्रता फडणीस | Published: May 8, 2023 03:12 PM2023-05-08T15:12:08+5:302023-05-08T15:12:24+5:30

मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार माजी सनदी अधिकारी शरद काळे यांना जाहीर

N.M.V. Lifetime Achievement Award Dr. Announced to Mohan Agashe and Mukund Abhyankar | नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि मुकुंद अभ्यंकर यांना जाहीर

नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार डॉ. मोहन आगाशे आणि मुकुंद अभ्यंकर यांना जाहीर

googlenewsNext

पुणे : नू.म.वि. प्रशालेच्या 'आम्ही नूमवीय' या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येणारा यंदाचा नू.म.वि. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अर्थ सल्लागार आणि कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष मुकुंदराव अभ्यंकर यांना जाहीर करण्यात आला आहे, तर मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार माजी सनदी अधिकारी शरद काळे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती अजित रावेतकर, मोहन उचगावकर, मिलिंद शालगर आणि किशोर लोहोकरे यांनी दिली.

शनिवारी (दि.१३) सायंकाळी ६ वाजता बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडे उपस्थित राहणार आहेत. यंदा या पुरस्कारांचे तिसरे वर्ष असून विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविलेल्या माजी विद्यार्थ्यांना हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. यंदा नू.म.वि. रत्न पुरस्कार माधव ढेकणे, रवींद्र कुलकर्णी, रमाकांत परांजपे, प्रकाश भोंडे आणि अॅड. विजय सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. तर नू.म.वि. भूषण पुरस्कार जगदीश आफळे, डॉ. अविनाश भोंडवे, मुकुंद संगोराम, मोहनकुमार भंडारी, प्रमोद फळणीकर आणि डॉ. अमित काळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर बरोबर यशस्वी तरुण नूमवीय म्हणून जसराज जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: N.M.V. Lifetime Achievement Award Dr. Announced to Mohan Agashe and Mukund Abhyankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.